एक्स्प्लोर
Advertisement
दहावीचे 20 गुण कमी केल्याने विद्यार्थी संतप्त, शिक्षणमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले
एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे 20 गुण कमी केल्याप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली.
मुंबई : एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे 20 गुण कमी केल्याप्रकरणी छात्र भारती विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या असून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले.
शिक्षणमंत्री होश मे आओ, विनोद तावडे गो बॅक, विनोद तावडे खुर्ची खाली करा अशा घोषणा देत छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रभादेवीच्या रविंद्र नाट्य मंदिराचा परिसर आज दणाणून सोडला.
दहावी, बारावी करिअर मार्गदर्शन कार्यशाळेच्या उद्घाटनाला शिक्षणमंत्री विनोद तावडे आज रविंद्र नाट्य मंदिर येथे आले होते.
त्यावेळी एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे 20 गुण कमी केल्याप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली.
दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्याला त्याचे अंतर्गत मूल्यमापन करून शाळा 20 गुण देत होत्या. परंतु 2018-19 या शैक्षणिक वर्षात ही पद्धत बंद करण्यात आली आहे. तसेच अभ्यासक्रमातसुद्धा बदल झाला आहे. त्यामुळे दहावीच्या निकालाची टक्केवारी घसरली असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement