एक्स्प्लोर

South Mumbai Loksabha Election 2024: 'दक्षिण मुंबईत रामराज्य हवे असेल, तर महायुतीशिवाय पर्याय नाही...'; मंगलप्रभात लोढा यांचं आवाहन

South Mumbai Loksabha Election 2024: दक्षिण मुंबईतून महायुतीच्या अधिकृत उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेद्वारे भोईवाडा येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.

Mumbai Loksabha Election 2024: मुंबई: प्रभू श्रीरामांना देखील रावणाचा वध करावा की नाही असा संभ्रम होता. कारण रावण ज्ञानी आहे, धार्मिक आहे असे अनेकांनी त्यांना सांगितले होते. विवेक बुद्धीने प्रभू श्रीरामांनी योग्य तो निर्णय घेत आपल्या धनुष्यबाणाने रावणाचा वध केला, म्हणून आज रामराज्य आले. आजच्या युगात तुमच्यासमोर देखील धनुष्यबाणाच्या सहाय्याने दक्षिण मुंबईमध्ये (South Mumbai Loksabha 2024) रामराज्य आणण्याची संधी आहे. त्यामुळे विकासासाठी, आपल्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येऊन दक्षिण मुंबई लोकसभा महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांना विजयी करूया, असे आवाहन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

9 मे 2024 रोजी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतून महायुतीच्या अधिकृत उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेद्वारे भोईवाडा येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी राज्यसभा खासदार मिलिंद देवरा, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, इतर मान्यवर मंडळी यांच्यासह मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राज ठाकरे हे नेहमीच मराठी माणसासाठी लढणारे एक लोकप्रिय नेते आहेत. त्यांच्यासोबत असलेले जीवाला जीव देणारे साथीदार ही त्यांची सर्वात मोठी कमाई आहे. पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान पदी निवडण्यासाठी राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे महाराष्ट्रात महायुतीची ताकद अधिक मजबूत झाली आहे, असे देखील याप्रसंगी बोलताना कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

कोण आहेत यामिनी जाधव? (Who Is Yamini Jadhav)

सध्या शिंदे गटात असलेल्या यामिनी जाधव या भायखळा मतदारसंघाच्या (Byculla MLA Yamini Jadhav) आमदार आहेत. एकेकाळी ठाकरेंचे विश्वासू अशी ओळख असलेल्या यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या त्या पत्नी आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांची ईडी चौकशी सुरू झाली होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर यशवंत जाधव यांनी शिंदेंची साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्यामागे असलेला ईडीचा ससेमिरा काही प्रमाणात थांबल्याचं सध्याचं चित्र आहे.  

नगरसेविका ते आमदार असा प्रवास (Byculla Assembly Election Results 2019)

यामिनी जाधव या 2012 साली मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या तिकिटावर नगरसेविका म्हणून निवडून आल्या. त्यांनी महापालिकेत विविध समित्यांवर काम केलं आणि आपली छाप उमटवली. भायखळा विधानसभा मतदारसंघ हा तसा मुस्लिमबहुल मतदारसंघ आहे. 2014 सालच्या निवडणुकीत या ठिकाणाहून एमआयएमच्या वारिस पठाण यांनी बाजी मारली होती. त्यामुळे 2019 सालच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत ही जागा जिंकायचीच असा चंग बांधलेल्या शिवसेनेने यामिनी जाधव यांना तिकीट दिलं. पक्षाचा विश्वास सार्थ ठरवत यामिनी जाधव यांनी वारिस पठाण यांना पराभूत करत विधानसभेत प्रवेश केला. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 June 2024Raj Thackeray MNS Meeting : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज मुंबई बैठक संपन्न! ABP MajhaMedha Kulkarni On Drugs : पुण्यात ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश, मेधा कुलकर्णींचा धंगेकरांना सवाल!NEET Exam Scam : 'माझा'च्या प्रतिनिधीला 'नीट'चा आरोपी गंगाधरक़डून धमकावण्याचा प्रयत्न

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
K P Patil : 'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
चंद्रकांतदादांच्या काळातच पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला उधाण; मिटकरींचे गंभीर आरोप, महायुतीत तणाव?
चंद्रकांतदादांच्या काळातच पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला उधाण; मिटकरींचे गंभीर आरोप, महायुतीत तणाव?
Embed widget