एक्स्प्लोर
‘बाळासाहेब...बाळासाहेब’, ‘मोदी...मोदी’, मुंबई महापालिका दुमदुमली !

मुंबई : महापालिकेच्या सभागृहात भाजप नगरसेवकांनी ‘मोदी..मोदी’ अशा घोषणा दिल्या तर शिवसेना नगरसेवकांनी ‘बाळासाहेब… बाळासाहेब’ अशा घोषणा देत भाजपला उत्तर दिलं. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या सभागृहात शिवसेना-भाजपमध्ये काही वेळ घोषणायुद्ध पाहायला मिळालं. मुंबई महापालिकेच्या सभागृहात घोषणाबाजीमुळे वातावरण थोडं गरम झालं. शिवसेनेचया विश्वनाथ महाडेश्वर यांच्या निवडीनंतर भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी त्यांच्या गळ्यात कमळाच्या फुलांचा हार घालून महाडेश्वरांचं अभिनंदन केलं. मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा महापौर बसल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईकरांचे आभार मानले. त्यानंतर उद्धव ठाकरे कुटुंबियांसह हुतात्मा चौकात दाखल झाले आणि हुताम्यांना अभिवादन केलं. मुंबई महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर आणि उपमहापौरपदी हेमांगी वरळीकर विराजमान झाल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी महापालिकेत महाडेश्वरांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं. शिवसेनेच्या विश्वनाथ महाडेश्वर यांना भाजपनं पाठिंबा दिला. त्यांना एकूण 171 मतं पडली. मात्र, यावेळी भाजपला पाठिंबा देणाऱ्या मुमताज खान यांनी भाजपच्या बाजूनं मतदान करण्यास नकार दिला. तर मनसेचे सातही नगरसेवक सभागृहात अनुपस्थित राहिले. यावेळी काँग्रेसच्या विठ्ठल लोकरे यांना अवघी 31 मतं मिळाली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























