एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वांद्र्यात बहुमजली झोपडीचा भाग कोसळला, सहा जणांचा मृत्यू
मुंबई : मुंबईतील वांद्र्याच्या बहराम पाडा परिसरात चार मजली झोपडीचा भाग कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी आहेत. मृतांमध्ये तीन मुलं आणि तीन मुलींचा समावेश आहे. याशिवाय काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
वांद्रे पूर्वमधील बहरामपाडा परिसरात आज दुपारी एकच्या सुमारास ही दुर्घटना घडली. चार मजली झोपडीचा भाग कोसळला. ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या दुर्घटनेत आएशा अकबर खान (वय 12 वर्ष), अली निसार अहमद खान (वय साडे तीन वर्ष), ओसामा निसार खान (वय 14 वर्ष), अफिफा सदाब (वय 1 वर्ष), अरबी सदस निसार खान (वय 2 वर्ष), रुसदा निसार अहमद खान (वय 16 वर्ष) यांचा मृत्यू झाला आहे. तर दौलत शेख (वय 50 वर्ष), झुल्फिकार (20 वर्ष), सखैया (वय 40 वर्ष) हे तिघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अग्निशमन दलाच्या 5 गाड्या आणि काही अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या असून मदतकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. तसंच मदतीसाठी एनडीआरएफची एका पथकालाही बोलावण्यात आलं आहे.
या परिसरात अवैध पद्धतीने अनेक झोपड्या उभारल्या आहे. महत्त्वाचं म्हणजे महापालिकेने वारंवार नोटीसही पाठवली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
क्राईम
निवडणूक
Advertisement