(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PuneKar on Next CM | पुणेकरांना मुख्यमंत्री कोण हवाय? वाफळता चहा; राजकारणावर गरमागरम चर्चा
PuneKar on Next CM | पुणेकरांना मुख्यमंत्री कोण हवाय? वाफळता चहा; राजकारणावर गरमागरम चर्चा
हेही वाचा :
राज्यात सध्या एकीकडे मुख्यमंत्री कोण होणार, याची चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे निवडून आलेल्या आमदारांचे डोळे मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार, याकडे लागले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, महायुती सरकारने मंत्रिमंडळासाठी (Maharashtra Cabinet) 21-12-10 असा फॉर्म्युला निश्चित केल्याची माहिती आहे. त्यानुसार सर्वाधिक मोठा पक्ष असलेल्या भाजपला 21, त्यापाठोपाठ शिंदे गटाला 12 आणि अजितदादा गटाला 10 मंत्रीपदे मिळणार आहेत. मात्र, या सगळ्यात राज्यात वचक ठेवण्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती कोणाकडे राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपने मुख्यमंत्रिपदावर दावा ठोकला असतानाच दुसरीकडे प्रशासनातील तीन महत्त्वाची खाती स्वत:कडे ठेवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. भाजपकडून अर्थ, गृह आणि सामान्य प्रशासन या तीन महत्त्वाच्या खात्यांवर दावा सांगितला आहे. महायुती सरकारच्या गेल्या टर्ममध्ये अजित पवार हे अर्थमंत्री होते. या खात्याच्या माध्यमातून अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना मोठे आर्थिक पाठबळ पुरवले होते. त्यामुळे शिंदे आणि भाजपचे आमदार अजितदादांवर नाराजही होते. मात्र, आता भाजपने हे अर्थ खाते स्वत:कडे घेण्याची तयारी सुरु केली आहे. भाजपकडे अर्थ खाते आल्यास ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहण्याची शक्यता आहे. अर्थ खात्याच्या मोबदल्यात अजितदादा गटाला महसूल किंवा सार्वजनिक बांधकाम खाते दिले जाईल, अशी चर्चा आहे. तर गृह खाते भाजपकडेच राहिल्यास ते कोण सांभाळणार, याबाबतही अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.