एक्स्प्लोर

Gunratna Sadavarte : सिल्व्हर ओक आंदोलन प्रकरण: सदावर्तेंची जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव

Gunratna Sadavarte : सिल्वर ओकवरील आक्रमक आंदोलन प्रकरणी अटकेत असलेल्या अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.

Gunratna Sadavarte : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरील आंदोलन प्रकरणात एसटी कामगारांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर बुधवारी सुनावणी घेण्याचं न्यायाधीश आर.एम. सादराणी यांनी निश्चित केलं आहे. तसेच याच प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 115 एसटी कामगारांच्या जामीन अर्जावरही बुधवारी एकत्रित सुनावणी घेण्याचं कोर्टानं निश्चित केलं आहे. या सर्वांच्य जामीन अर्जावर उत्तर देण्यासाठी मंगळवारी राज्य सरकारनं कोर्टाकडे वेळ मागून घेतला.

एसटी कामगारांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा आता कोल्हापूर पोलीसांना देण्यात आला आहे. कोल्हापूरच्या शाहूपूरी पोलीस ठाण्यात मराठा समाजाबद्दल द्वेष पसरवल्याप्रकरणी सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर पोलीसांनी याप्रकरणी सदावर्तेंची ताब्यात घेऊन चौकशी करण्याकरता गिरगाव कोर्टात रितसर अर्ज केला होता. त्यानुसार सदावर्ते यांचा ताबा कोल्हापूर पोलीसांना देण्यात आला. त्यानंतर कोल्हापूर पोलीसांचं विशेष पथक त्यांना आर्थर रोड कारगृहातून ताब्यात घेण्यासाठी रवाना झालं.

शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकवर झालेल्या आंदोलन प्रकरणी गुणरत्न सदावर्तेंना मंगळवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी वाढवून देण्यात आली. त्यांची न्यायालयीन कोठडी संपत असल्यानं त्यांना गिरगाव दंडाधिकारी कोर्टात न्यायाधीश एन.ए. पटेल यांच्यासमोर हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी सदावर्तेंची पुढील चौकशीसाठी रिमांड हवी असल्याची मागणी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टाकडे केली. एसटी कामगारांकडनं गोळा केलेल्या कोट्यावधी रूपयांतून वरळीत एक दुकानाचा गाळा तसेच केरळ येथून एक आलिशान कार विकत घेतल्याची माहिती मिळाल्याचं कोर्टाला सांगितलं. तसेच सदवर्तेंच्या घरातून नोटा मोजण्याची एक मशिन आणि बरीच कागदपत्र मिळाली आहेत. त्यामुळे हर्षद मेहताच्या घोटाळ्यानुसार हादेखील एक प्रचंड मोठा आर्थिक घोटाळा असल्यानं याची चौकशी करण्यासाठी सदावर्तेंना पुन्हा एकदा ताब्यात देण्याची मागणी सरकारी वकिलांकडनं करण्यात आली.

यावेळी सदावर्तेंनी आपल्या बचावात स्वत: युक्तिवाद करत राज्य सरकारचे आरोप फेटाळून लावले. सदावर्तेंनी कोर्टाला सांगितलं की, एसटी कामगारांकडनं त्यांनी घेतलेले पैसे हे कोर्ट फीसाठी घेतले होते. जे न्यायालयीन कामकाजासाठी लागणारा खर्च म्हणून प्रत्येकी 300 ते 500 रूपये असे घेतले होते. तसेच मुंबईत एखद्याच्या घरी पैसे मोजायची मशिन सापडणं हा काही गुन्हा होऊ शकत नाही. ती मशिन आपण अवघ्या तीन हजारांत विकत घेतल्याचं त्यांनी कोर्टात स्पष्ट केलं. तसेच ज्या गाडीचा उल्लेख सरकारी वकिलांनी केला ती आपण सेकंडहँड विकत घेतली असून त्याचे ऑनलाईन पैसे भरत रितसर आरटीओत नोंदणी केल्याचीही त्यांनी कोर्टाला माहिती दिली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सदावर्तेंची रिमांड नाकारत त्यांना पुन्हा एकदा 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत गिरगाव कोर्टानं पाठवलं आहे.

दरम्यान सोलापुरातही याच संदर्भात सदावर्तेंविरोधात नव्यानं गुन्हा करण्यात आलाय. त्यामुळे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात मुंबई, सातारा, अकोले, कोल्हापूर, बीड आणि सोलापूर अश्या सहा ठिकाणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ज्यापैकी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्यांना मंगळवारी जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र दाखल गुन्ह्यांचं सत्र पाहता पुढचे काही दिवसतरी गुणरत्न सदावर्ते यांचा मुक्काम या जेलमधून त्या जेलमध्येच होत राहण्याची चिन्ह आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

HSC SSC Marksheet Update : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचा जात प्रवर्ग, शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरणKolkata Sanjay Roy Found Guilty : कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषीABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Embed widget