एक्स्प्लोर
अंगारकीनिमित्त भाविकांची सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी गर्दी
मुंबईकरांचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
मुंबई : मुंबईकरांचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. अंगारकीनिमित्त सिद्धिविनायकाची रात्री 12 वाजता विशेष महापूजा करण्यात आली. अंगारकी चतुर्थी असल्याने आज दिवसभर भाविकांची सिद्धिविनाय़क मंदिरात गर्दी असणार आहे.
अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सिद्धिविनायक मंदिरात भाविक दर मंगळवारी दर्शनासाठी गर्दी करतात. मात्र आज अंगारकी आणि मंगळवार असा दुहेरी योग जुळून आल्याने भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.
मंदिरात रात्री 12 वाजता विशेष महापूजा झाल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. तेव्हापासून सकाळी साडेसात वाजेपर्यंत जवळपास दोन लाख भाविकांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्याची माहिती सिद्धिविनायक ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी संजीव पाटील यांनी दिली.
सुरक्षेच्या आणि सुविधेच्या दृष्टीने भाविकांसाठी वेगळ्या रांगा
- स्त्री, पुरूष आणि दुरुन दर्शनासाठी वेगळ्या रांगा करण्यात आल्या आहेत.
- पुरुषासाठी दर्शनरांगेची व्यवस्था रवींद्र नाट्यमंदिरापासून करण्यात आली आहे.
- स्त्रियांसाठी सिल्वर अपार्टमेंटपासून दर्शन रांगेची सोय करण्यात आली आहे.
- रांगेत उभ्या असलेल्या भाविकांसाठी मंदिर प्रशासनाने चहाची सोय करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement