एक्स्प्लोर
'भारत बंद'ला शिवसेनेचा पाठिंबा नाही, विरोधकांना उशिरा जाग आल्याचा टोला
शिवसेना मात्र या भारत बंदमध्ये सहभागी होणार नाही. विरोधकांना उशिरा जाग आल्याचा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला.

प्रातिनिधिक फोटो
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेसने 10 सप्टेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला राज्यात राष्ट्रवादी काँग्रेससह मनसेनेही पाठिंबा दिला आहे. शिवसेना मात्र या भारत बंदमध्ये सहभागी होणार नाही. विरोधकांना उशिरा जाग आल्याचा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला. विरोधकांनी त्यांची ताकद जरुर दाखवावी. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष मजबूत असणं गरजेचं आहे. शिवसेना बंदकडे तटस्थपणे पाहत आहे. महागाई वाढली आहे, विरोधी पक्षांनी त्यांची भूमिका चोख बजावावी, असं संजय राऊत यांनी सांगितलं. मनसेचा पाठिंबा देशभरातील इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने पुकारलेल्या 'भारत बंद'ला मनसेने पाठिंबा दर्शवला आहे. काँग्रेसने 10 सप्टेंबर म्हणजेच उद्या 'भारत बंद'ची हाक दिली आहे. मनसे उद्या पूर्णपणे या बंदमध्ये सहभागी होणार आहे. मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन 'भारत बंद'ला पाठिंबा देतील. मात्र कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होणार नाही, असं आश्वासन मनसेतर्फे देण्यात आलं आहे. मुंबईतून बाहेरगावी जाणाऱ्यांनी उद्या संध्याकाळी पाच वाजल्यानंतर बाहेर पडावं, असं आवाहन मनसेने केलं आहे. उद्या सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत 'भारत बंद' ठेवण्याचं आवाहन काँग्रेसने केलं आहे.
आणखी वाचा























