एक्स्प्लोर
Advertisement
उद्धवा, अजब तुझे सरकार! शिवसेनेच्या स्थायी अध्यक्षांची उद्विग्नता?
स्थायी समिती अध्यक्ष असलेल्या शिवसेनेच्या यशवंत जाधव यांनी 'उद्धवा, अजब तुझे सरकार, हे गाणं गायल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मुंबई : महापौर बंगल्यावर साजऱ्या झालेल्या 'दिवाळी संध्या' कार्यक्रमात स्थायी समितीच्या अध्यक्षांनी मनातली उद्विग्नता मांडली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्थायी समिती अध्यक्ष असलेल्या शिवसेनेच्या यशवंत जाधव यांनी 'उद्धवा, अजब तुझे सरकार, हे गाणं गायल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
महापौर बंगल्यावर 'दिवाळी संध्या' कार्यक्रमाची सुरुवातच स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी 'उद्धवा, अजब तुझे सरकार' हे गाणं गाऊन केली. 'जगाच्या पाठीवर' या चित्रपटातलं हे गाणं गदिमा म्हणजेच ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलं आणि सुधीर फडकेंनी गायलं आहे. हे अजरामर गीत सरकार आणि व्यवस्थेप्रती उद्विग्नता व्यक्त करणारं आहे.
शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचं नावही उद्धव ठाकरे. महापालिकेत शिवसेनेचीच सत्ता आहे. मात्र त्यांच्याच पक्षातील महत्त्वाच्या पदावरच्या व्यक्तीने 'उद्धवा अजब तुझे सरकार'चा राग आळवला आणि श्रोत्यांमध्ये एकच खसखस पिकली.
यंदा शिवाजी पार्कच्या महापौर बंगल्यावर अखेरची दिवाळी संध्या साजरी झाली. दरवर्षी मुंबईचे महापौर हे महापौर निवासावर महापालिका अधिकारी, नगरसेवक, पत्रकार यांच्यासाठी दिवाळीनिमित्त अनौपचारिक मेळाव्याचं आयोजन करतात.
शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याच्या ठिकाणी आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक होणार आहे. त्यामुळे लवकरच महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनाही आपला मुक्काम शिवाजी पार्क सोडून भायखळ्याच्या राणीच्या बागेतील बंगल्यात हलवावा लागणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement