एक्स्प्लोर

रोहित आर्याशी बोलण्यास दीपक केसरकरांनी का दिला नकार? पवई ओलीसनाट्यादरम्यान नेमकं घडलं काय?

माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे . रोहित आर्यशी बोलण्यासाठी नकार का दिला ? याचं कारणही त्यांनी स्पष्ट केलंय .

Mumbai Hostage case:  पवई येथील तीन तासांच्या ओलीस नाट्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली . मुंबईतील पवई परिसरातील एका स्टुडिओमध्ये 17 अल्पवयीन मुलांना पोलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा (Rohit Arya) पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला . मात्र हे ओलीस नाट्य घडत होतं तेव्हा रोहित आर्य याने पोलिसांना माझी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले होते . एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने जेव्हा केसरकर यांच्याशी संपर्क साधला तेव्हा रोहित आर्य याच्याशी बोलायला केसरकर यांनी नकार दिला . यावरून माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे . रोहित आर्यशी बोलण्यासाठी नकार का दिला ? याचं कारणही त्यांनी स्पष्ट केलंय .

Deepak Kesarkar: काय म्हणाले दीपक केसरकर ?

माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले,'' कोणाचा एनकाउंटर होणार हे कुणाला माहिती नव्हतं. मुलांना ओलीस धरलं चुकीचं होत. त्यामुळे मुलांचा जीव महत्वाचा होता. मी मंत्री नसल्याने ठोस आश्वासन देऊ शकत नव्हतो. त्यांनी मंत्र्यांशी संपर्क साधला असता आणि ते उपलब्ध नसल्यास त्यांनी मला पुन्हा संपर्क केला असता आणि विनंती केली असती तर आवश्यक बोललो असतो. त्यांना त्या विभागाचे मंत्रीच आश्वासन देऊ शकले असते." पोलिसांनी कुणाशी संपर्क साधला हा त्या खात्याचा प्रश्न होता. मुलांना ओलीस धरलं हे अत्यंत चुकीच होत. आश्वासन न देता नुसत बोलायचं असत तर बोललो असतो. त्याने मुलाना ओलीस ठेवून त्याला ठोस आश्वासन हवं होत तर त्या खात्याच्या मंत्री किंवा त्या खात्याच्या अधिकाऱ्यांना होते. ते अधिकार मला नाहीत."

'निर्णय त्या परिस्थितीनुसार घ्यावे लागतात...'

केसरकर पुढे म्हणाले, ''मुलांना ओलीस धरलं तेव्हा मला पोलिसांचा फोन आला तेव्हा मी बोलतो म्हणून सांगितलं. मात्र जेव्हा मला मुल ओलीस ठेवलं आणि तिथे ज्वलनशील पदार्ध आहेत, हे समजल्यानंतर त्याला ठोस आश्वासन मिळालं नसत आणि मुलांना काही केलं असत तर ते चुकीच झालं असत. त्यामुळे ते निर्णय त्या परिस्थिती नुसार घ्यावे लागतात. मी मंत्री नसल्यामुळे मी आश्वासन देण्याची माझी क्षमता नाही. यात मुलांचा प्रश्न महत्वाचा होता. यात एनकाउंटर होणार हे कुणालाही वाटलं नसतं. 

मला एकदाच संपर्क झालेला होता. आश्वासना व्यतिरिक्त अजून काही मदत हवी असल्यास मला फोन वर सांगितल असतं तर ती वेगळी बाब होती. माझी चौकशी आवश्यक असावी. पोलिसांना जे काही माहिती पाहिजे ती देऊ. रोहित आर्या यांच्याशी पहिल्यादा पोलिसांना बोलतो म्हणून सांगितलं होत, मात्र मुलांना ओलीस धरलं हे समजलं, मुलांचा जीव धोक्यात होता, तेव्हा मी बोलण्यास नकार दिला." असंही टे पुढे म्हणाले.

17 अल्पवयीन मुलांना ओलीस ठेवलं ...

पवईतील स्टुडिओमध्ये 30 ऑक्टोबर रोजी घडलेल्या ओलीसनाट्यात रोहित आर्याने एकूण  17 अल्पवयीन मुलांसह, दोन वयस्कर लोकांना ओलीस ठेवले होते. आर्थिक व्यवहारांशी संबंधित काही मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले होते. आर्याचा दावा होता की, शिक्षण विभागासाठी केलेल्या कामाची थकीत रक्कम न मिळाल्यामुळे तो नाराज होता आणि त्यामुळेच त्याने हा मार्ग निवडला. ओलीसनाट्यादरम्यान रोहित आर्याने पोलिसांना स्पष्ट सांगितले की, “शालेय शिक्षण विभागासाठी मी प्रकल्प राबवला, पण त्याचे पैसे अजून मिळाले नाहीत.” या प्रकरणात आर्याला शिक्षण राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याशी थेट संवाद साधायचा होता. मिळालेल्या माहितीनुसार, एका डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याने परिस्थितीची माहिती देण्यासाठी केसरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, केसरकर यांनी आर्याशी बोलण्यास नकार दिला, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kagal Nagar Palika Election: कागल नगरपालिकेत भलतीच रंगत, एकाकी पडलेल्या संजय मंडलिकांच्या मदतीला आता पालकमंत्र्यांची रसद; घेतला तगडा निर्णय, मुश्रीफ विरुद्ध आबिटकर सामना पुन्हा रंगणार
कागल नगरपालिकेत भलतीच रंगत, एकाकी पडलेल्या संजय मंडलिकांच्या मदतीला आता पालकमंत्र्यांची रसद; घेतला तगडा निर्णय, मुश्रीफ विरुद्ध आबिटकर सामना पुन्हा रंगणार
Maharashtra Temperature Today: दक्षिणेत पाऊस उत्तरेत बर्फ, महाराष्ट्रात हवामान पुन्हा बदलणार! पुण्यासह कुठे किती पारा?
दक्षिणेत पाऊस उत्तरेत बर्फ, महाराष्ट्रात हवामान पुन्हा बदलणार! पुण्यासह कुठे किती पारा?
Bihar CM Nitish Kumar Oath मै सत्यनिष्ठा से...  बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारंचा शपथविधी, रचला नवा विक्रम; मोदींनी जवळ येऊन केलं अभिनंदन
मै सत्यनिष्ठा से... बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारंचा शपथविधी, रचला नवा विक्रम; मोदींनी जवळ येऊन केलं अभिनंदन
अंधेरी रेल्वे स्टेशनवर धर्मांतराचा दावा, पण पोलिस तपासात आली भलतीच माहिती समोर! सोशल मीडियात व्हिडिओ तुफान व्हायरल
अंधेरी रेल्वे स्टेशनवर धर्मांतराचा दावा, पण पोलिस तपासात आली भलतीच माहिती समोर! सोशल मीडियात व्हिडिओ तुफान व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

PM kisan Nidhi 21st Installment : शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांना लाभ
Chitra Wagh on Malegaon Dongarale : त्या हरामखोर सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता
Kagal Alliance : जुने वैरी, नवी यारी! घाटगे विरुद्ध मुश्रीफ संघर्षाचा इतिहास Special Report
Jaykumar Gore Solapur :पालिका निवडणुकांनंतर उरलेलेही भाजपात येण्यासाठी धडपडतील, गोरेंची टोलेबाजी
Balraje Patil On Ajit Pawar : चॅलेंज देणाऱ्यांना दादा माफ करणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kagal Nagar Palika Election: कागल नगरपालिकेत भलतीच रंगत, एकाकी पडलेल्या संजय मंडलिकांच्या मदतीला आता पालकमंत्र्यांची रसद; घेतला तगडा निर्णय, मुश्रीफ विरुद्ध आबिटकर सामना पुन्हा रंगणार
कागल नगरपालिकेत भलतीच रंगत, एकाकी पडलेल्या संजय मंडलिकांच्या मदतीला आता पालकमंत्र्यांची रसद; घेतला तगडा निर्णय, मुश्रीफ विरुद्ध आबिटकर सामना पुन्हा रंगणार
Maharashtra Temperature Today: दक्षिणेत पाऊस उत्तरेत बर्फ, महाराष्ट्रात हवामान पुन्हा बदलणार! पुण्यासह कुठे किती पारा?
दक्षिणेत पाऊस उत्तरेत बर्फ, महाराष्ट्रात हवामान पुन्हा बदलणार! पुण्यासह कुठे किती पारा?
Bihar CM Nitish Kumar Oath मै सत्यनिष्ठा से...  बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारंचा शपथविधी, रचला नवा विक्रम; मोदींनी जवळ येऊन केलं अभिनंदन
मै सत्यनिष्ठा से... बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारंचा शपथविधी, रचला नवा विक्रम; मोदींनी जवळ येऊन केलं अभिनंदन
अंधेरी रेल्वे स्टेशनवर धर्मांतराचा दावा, पण पोलिस तपासात आली भलतीच माहिती समोर! सोशल मीडियात व्हिडिओ तुफान व्हायरल
अंधेरी रेल्वे स्टेशनवर धर्मांतराचा दावा, पण पोलिस तपासात आली भलतीच माहिती समोर! सोशल मीडियात व्हिडिओ तुफान व्हायरल
Kagal Politics: कागलचा कट्टर वैरींचा राजकीय दोस्ताना नवा नाहीच अन् गुरु शिष्य वादाची सुद्धा घनघोर परंपरा!
Video: कागलचा कट्टर वैरींचा राजकीय दोस्ताना नवा नाहीच अन् गुरु शिष्य वादाची सुद्धा घनघोर परंपरा!
Prajakta Patil : उज्ज्वला थिटे अनगरला आल्या, तर मी...; बिनविरोध निवडणूक जिंकलेल्या राजन पाटलांच्या सूनबाईंची पहिली प्रतिक्रिया समोर
उज्ज्वला थिटे अनगरला आल्या, तर मी...; बिनविरोध निवडणूक जिंकलेल्या राजन पाटलांच्या सूनबाईंची पहिली प्रतिक्रिया समोर
MNS Shivsena UBT: मनसे-ठाकरे गटाच्या जागावाटपाचा 'श्रीगणेशा'; उद्धव ठाकरे राज ठाकरेंना किती जागा देण्यासाठी तयार?, महत्वाची माहिती समोर
मनसे-ठाकरे गटाच्या जागावाटपाचा 'श्रीगणेशा'; उद्धव ठाकरे राज ठाकरेंना किती जागा देण्यासाठी तयार?, महत्वाची माहिती समोर
Buldhana News: पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, न्यायालयीन कोठडीत असलेल्या काँग्रेसच्या नेत्याला अजितदादांच्या राष्ट्रवादीतून उमेदवारी, पोलीस संरक्षणात भरला अर्ज
पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, न्यायालयीन कोठडीत असलेल्या काँग्रेसच्या नेत्याला अजितदादांच्या राष्ट्रवादीतून उमेदवारी, पोलीस संरक्षणात भरला अर्ज
Embed widget