Shivsena Prabhadevi Rada : सदा सरवणकरांनी गोळीबार केल्याचं फुटेज पोलिसांना अद्याप सापडलं नाही, अंधार असल्यानं सीसीटीव्हीत फक्त गर्दीच
Shivsena Prabhadevi : प्रभादेवीत झालेल्या राडा प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले मात्र सदा सरवणकरांनी गोळीबार केल्याचं फुटेज पोलिसांना अद्याप सापडलं नसल्याची माहिती समोर येत आहे.
![Shivsena Prabhadevi Rada : सदा सरवणकरांनी गोळीबार केल्याचं फुटेज पोलिसांना अद्याप सापडलं नाही, अंधार असल्यानं सीसीटीव्हीत फक्त गर्दीच Shivsena Prabhadevi Rada Police still not found footage of Sada Saravankar firing only crowd in CCTV recorded Shivsena Prabhadevi Rada : सदा सरवणकरांनी गोळीबार केल्याचं फुटेज पोलिसांना अद्याप सापडलं नाही, अंधार असल्यानं सीसीटीव्हीत फक्त गर्दीच](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/12/fa26c93177c15e8a7e3b1ece2db742a1166298456275489_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबईतील प्रभादेवीत (Prabhadevi) शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटात झालेल्या राडा प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर (Shinde Group MLA Sada Sarvankar) यांनी केलेल्या गोळीबाराच्या आरोपांची चौकशी सुरू केली आहे. सदा सरवणकर यांनी दोन वेळेस गोळीबार केला असल्याचा आरोप होत आहे. ज्या ठिकाणी सरवणकरांनी गोळीबार केला त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आले. मात्र सदा सरवणकरांनी गोळीबार केलेले कोणतेही फुटेज पोलिसांना अद्याप सापडलं नाही.
प्रभादेवीत मध्यरात्रीच्या सुमारास शिवसेना आणि शिंदे गटात राडा झाला. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या दाव्यानुसार सदा सरवणकर यांनी दोन वेळेस गोळीबार केला. सरवणकर यांच्या गोळीबारात शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत (Mahesh Sawant) आणि एक पोलीस अधिकारी बचावला. तर, सरवणकर यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही तपासले मात्र गोळीबार केल्याचं फुटेज पोलिसांना अद्याप सापडलं नाही. घटनेवेळी अंधार असल्यानं सीसीटीव्हीत फक्त गर्दीच कैद झाली आहे. त्यामुळे अशी घटना घडली की नाही याबाबत पोलिस कोणत्या ठोस निर्णयापर्यंत आली नाही. शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी दोन वेळेस गोळीबार केला असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. सरवणकर यांनी पहिला गोळीबार प्रभादेवी जंक्शनजवळ केला. तर, दुसरा गोळीबार दादर पोलीस स्टेशनजवळ करण्यात आला असल्याचा आरोप आहे.
शिवसेनेकडून करण्यात आलेल्या आरोपात किती तथ्य आहे, याची पोलीस पडताळणी करणार आहेत. आमदार सदा सरवणकर यांच्याकडे परवाना असलेली पिस्तूल असेल तर त्याचे रेकॉर्ड नजीकच्या पोलीस ठाण्यात असणार. पोलीस हे रेकॉर्ड तपासतील. यामध्ये सरवणकर यांच्याकडे पिस्तुल आणि किती काडतुसे आहेत, याची माहिती नमूद असणार आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या माहितीनुसार सदा सरवणकर यांच्याकडे तेवढी काडतुसे असणे आवश्यक आहे. त्याशिवाय आता पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात येत आहे. पोलिस या सर्व गोष्टींचा तपास करत आहेत.
संबंधित बातम्या :
Shivsena Prabhadevi Rada : प्रभादेवी राडा: सदा सरवणकर यांचा कट्टर समर्थक ते विरोधक; महेश सावंत आहे तरी कोण?
Shivsena Prabhadevi : एकनाथ शिंदेंसोबत गेलो म्हणून मला बदनाम करण्याचा प्रयत्न; आमदार सदा सरवणकरांचा आरोप
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)