एक्स्प्लोर

'शिवस्मारक व्हावे ही बाळासाहेबांची इच्छा' शिवसेनेची पोस्टरबाजी

मुंबई : शिवस्मारकाचं भूमिपूजन तोंडावर आलेलं असताना शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई रंगण्याची चिन्हं आहेत. दादरमधील शिवसेना भवन परिसरात रातोरात सेनेने पोस्टर झळकवल्यामुळे हा वाद पुन्हा टोकाला जाण्याची शक्यता आहे. आपला योग्य तो सन्मान राखला गेला, तर शिवस्मारक भूमिपूजन सोहळ्याला उपस्थिती लावू, असे संकेत उद्धव ठाकरेंनी दिले होते. त्यानंतर भाजप मंत्री चंद्रकांत पाटील आणि विनोद तावडे निमंत्रण देण्यासाठी उद्धव यांच्या घरी म्हणजेच मातोश्रीवर गेले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी हे निमंत्रण स्वीकारल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.

उद्धव ठाकरेंची नाराजी दूर, पाटील-तावडेंचं निमंत्रण स्वीकारलं

पंतप्रधानांसोबत उद्धव ठाकरे प्रत्यक्ष जलपूजन कार्यक्रमात असतीलच, शिवाय त्यांचा सर्व प्रकारचा सन्मान राखला जाईल, असं चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं. ‘दिलजमाई हा शब्द तेव्हाच येतो, जेव्हा अंतर निर्माण झालेलं असतं, मात्र शिवसेना-भाजपमध्ये अंतर नाहीच’ अशी पुस्तीही पाटलांनी जोडली होती. अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या भूमीपूजन सोहळ्यासाठी 24 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह फक्त सहा जण जाणार आहेत. भूमीपूजन आणि जलपूजनाला समुद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी विद्यासागर राव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार उदयनराजे भोसले, खासदार संभाजीराजे छत्रपती जाणार आहेत. Shivsena Shivsmarak Poster (1)

मोदी रामापेक्षा मोठे नाहीत, घोषणाबाजीनंतर रावतेंचा संताप

गुरुवारीच पश्चिम रेल्वेवरील राम मंदिर या नव्या स्थानकाच्या उद्घाटन सोहळ्यात शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी रंगली होती. शिवसेनेकडून बाळासाहेबांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या, तर भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाची घोषणाबाजी करण्यात आली. भाषण सुरु होऊनही घोषणाबाजी न थांबल्याने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना संताप अनावर झाला. भाजप कार्यकर्त्यांकडून मोदींच्या नावाची घोषणाबाजी करण्यात येत होती. मोदी हे रामापेक्षा मोठे नाहीत, अशी टिप्पणी रावते यांनी केली. शिवाय भाजप कार्यकर्ते बोलू देत नसल्याचं सांगत रावते माईक सोडून निघून गेले.

संबंधित बातम्या :

उद्धव ठाकरेंची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे मंत्री ‘मातोश्री’वर जाणार!

उद्धव ठाकरेंची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे मंत्री ‘मातोश्री’वर जाणार!

शिवस्मारकाच्या भूमीपूजनासाठी भाजपचा गाजावाजा

शिवरायांचा पुतळा बनवायला मिळणं भाग्य समजतो : राम सुतार

अरबी समुद्रातील शिवस्मारकाला मच्छिमारांचा तीव्र विरोध

शिवस्मारकासाठी 16 ठिकाणाहून माती आणि पाणी, सर्व राजघराण्यांना निमंत्रण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Embed widget