एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
संजय राऊत यांचे 'रोखठोक' प्रश्न, मुख्यमंत्री देणार उत्तरं
मुंबईत 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार सोहळ्यात दुपारी चार वाजता ही मुलाखत होणार आहे
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची घेतलेली मुलाखत ताजी असतानाच आणखी एक राजकीय मुलाखत महाराष्ट्राच्या राजकारणात रंगणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या प्रश्नांना चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सामोरे जाणार आहेत.
मुंबईत 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार सोहळ्यात दुपारी चार वाजता ही मुलाखत होणार आहे. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, रेल्वे मंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस, अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री कतरीना कैफ आणि माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
संजय राऊत आतापर्यंत शिवसेनेचा किल्ला लढवत भाजपशी अटीतटीची लढाई करत आले आहेत. शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'तून अनेकदा मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली जाते, मात्र यानिमित्ताने शिवसेना-भाजपमध्ये वेगळाच 'सामना' रंगणार आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत घेणार मुख्यमंत्र्यांची मुलाखत
संजय राऊत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तर 'एबीपी न्यूज'चे ज्येष्ठ पत्रकार पुण्यप्रसून बाजपेयी पियुष गोयल यांची मुलाखत घेणार आहेत. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर प्रथमच संजय राऊत हे ठाकरे कुटुंबाबाहेरच्या राजकीय नेत्याची मुलाखत घेणार आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्रीही पहिल्यांदाच एखाद्या शिवसेना नेत्याला जाहीर मंचावर सामोरे जाणार आहेत. संजय राऊतांचे रोखठोक प्रश्न आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सडेतोड उत्तरे उत्सुकतेचा विषय ठरणार आहेत. एकीकडे 2019 निवडणुकांच्या तोंडावर भाजपकडून शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न होत आहे, तर शिवसेनेने स्वबळाची तलवार उपसली आहे. त्यामुळे या मंचावर नेमकं काय होणार, हे पाहणं उत्कंठेचं ठरेल.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement