उद्धव ठाकरेंनी राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी नाही मग मशिदीच्या, चर्चच्या भूमिपूजनासाठी जायचं का? : प्रताप सरनाईक
ज्यावेळी देशातील सर्व सिंह बिळात लपून बसले होते त्यावेळी शिवसेनेच्या ढाण्या वाघाच्या डरकाळीमुळे राम मंदिर कार्य मार्गी लागले. आणि आज ते होतं आहे. त्यामुळे राम मंदिरासाठी बनवण्यात आलेल्या ट्रस्टने सन्मानाने मुख्यमंत्री उद्धार ठाकरे यांना राम मंदिर उद्घाटनाच्या कामासाठी बोलवावं, असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं.
मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजिद मेमन यांना उत्तर दिलं आहे. माजिद मेमन यांनी ट्वीट करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यात सहभागी न होण्याची मागणी केली होती. त्याला उत्तर देत आमदार प्रताप सरनाईक म्हणाले की, शिवसेनेने हिंदुत्वाची कास कधीही सोडली नाही. राज्यातील महविकास आघाडीचं सरकार केवळ भाजपच्या विरोधात एकत्र आलं आहे. त्यामुळे आपला अजेंडा सोडण्याचा विषयच येतं नाही. शिवसेनेचा अजेंडा हा हिंदुत्वाचा आहे. तो अजेंडा शिवसेना कधीही सोडणार नाही.
राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आलेले तिन्ही पक्ष हे भाजपच्या विरोधात एकत्र आले आहेत. या तिन्ही पक्षांचा जो अजेंडा आहे तो वेगवेगळा आहे. यामध्ये शिवसेना आपला हिंदुत्वाचा अजेंडा कधीही सोडणार नाही. आमदार प्रताप सरनाईक यांनीच राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत नित्य गोपाल दास यांना पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील भूमिपुजन कार्यक्रमासाठी नियंत्रित करावे अशी मागणी केली होती. तसेच राम मंदिर निर्माण कार्यामध्ये शिवसेनेचं योगदान पाहता एका जुन्या रामभक्त शिवसैनिकाला राम मंदिर ट्रस्टवर नेमणूक करण्याची मागणीही त्यांनी केली होती.
प्रताप सरनाईक यांनी भाजपवर राम मंदिराच्या नावावर राजकारण करण्याचा आरोप करत म्हटलं की, महत्त्वाची बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी भाजपकडून निमंत्रण येण्याबाबत, तर त्यांना मी आठवण करून देतो की, ज्यावेळी देशातील सर्व सिंह बिळात लपून बसले होते त्यावेळी शिवसेनेच्या ढाण्या वाघाच्या डरकाळीमुळे राम मंदिर कार्य मार्गी लागले. आणि आज ते होतं आहे. त्यामुळे राम मंदिरासाठी बनवण्यात आलेल्या ट्रस्टने सन्मानाने मुख्यमंत्री उद्धार ठाकरे यांना राम मंदिर उद्घाटनाच्या कामासाठी बोलवावं. राम मंदिर निर्माणासाठी एकाही नेत्याने एक रुपयाही दिला नव्हता, त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तब्बल 1 कोटी रुपयांची रक्कम राम मंदिर ट्रस्टला देऊ केली आहे. राम मंदिरासाठी जे शिवसेनेने केलं आहे ते इतर कोणीही केलं नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सन्मानाने बोलावण्यात यावं.’
या विषयावर महाराष्ट्र राजकारण बरच तापलंय. शिवसेना नेता संजय राऊत म्हणाले होते की, उद्धव ठाकरे यांना अयोध्येला जाण्यासाठी कोणाच्या ही एनओसीची गरज नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येला भूमिपूजनला नक्की जाणार. या संपूर्ण विषयाशी शिवसेनेचे भावनिक, राष्ट्रीय, धार्मिक नातं कायमच जोडलेलं आहे.
काँग्रेसने देखील या विषयापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे राम दर्शनासाठी अयोधेयला गेले. त्यावेळी काँग्रेसचे नेते मंत्री सुनील केदार देखील सोबत होते. आज तेच सुनील केदार म्हणतायत ‘मुख्यमंत्र्यांचा निर्णय जो असेल त्यावर आम्ही बोलणार नाही. राम मंदिर हा प्रत्येकाच्या आस्थेचा विषय आहे.’
संबंधित बातम्या
- काहींना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल, राममंदिर भूमीपूजनावरुन शरद पवारांचा मोदींना टोला
- Ram Mandir | ठरलं!, अयोध्येत 5 ऑगस्टला पंतप्रधान मोदी करणार राममंदिराचं भूमिपूजन
- राम मंदिराच्या कामाचा मुहूर्त ठरला, असं असेल राममंदिर!
Ram Mandir | मंदिर श्रद्धेचा विषय, राजकारण नको, शरद पवारांच्या राम मंदिराच्या टोल्यावरून मुनगंटीवारांचं उत्तर