एक्स्प्लोर

Eknath Shinde : मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना तुम्हाला लाज वाटायला पाहिजे होती; एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर 

Dasara Melava : उद्धव ठाकरे कोथळा काढायची भाषा करतात, त्यांनी आयुष्यात कधी कुणाला चापट तरी मारलीय का असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी विचारला. 

मुंबई: उद्धव ठाकरे मला कटप्पा म्हणाले, पण तो स्वाभिमानी होता, तुमच्यासारखा दुटप्पी नव्हता असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. बाळासाहेबांचे विचार तोडून मोडून मुख्यमंत्रीपदाची शपथ तुम्ही घेतली, त्यावेळी तुम्हाला लाज वाटायला पाहिजे होती अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली. 

उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "लाज तुम्हाला वाटायला पाहिजी होती, बाळासाहेबांचे विचार तोडून मोडून मुख्यमंत्रीपदाची शपथ तुम्ही घेतली. त्यावेळी या आमदारांनी विरोध केला होता. तुम्हाला लाज वाटली पाहिजे होती मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला. नारायण राणे म्हणाले होते की, बाळासाहेब असते तर हे मुख्यमंत्री झालेच नसते. एकनाथ शिंदे याने जेवढा त्याग केला आहे तो यांना समजलाच नाही. माझा त्याग काय आहे आणि तुमचा त्याग काय आहे? एकनाथ शिंदे घरात पहाटे तीन-चार वाजता जायचा, त्यावेळी बाप झोपला असायचा. त्याची माझी पंधरा पंधरा दिवस भेटच व्हायची नाही."

एकनाथ शिंदे म्हणाले की, "आम्ही कोणत्याही शिवसैनिकाला त्रास दिला नाही. आम्हाला कुणावरही अशा प्रकारचा अन्याय करुन प्रवेश करुन घ्यायचा नाही हे मी जाहीरपणे सांगतो. निष्ठावंत शिवसैनिकांनी सांगावं, पक्षप्रमुखपदाचा राजीनामा देतो असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. पण आता इमोशनल ब्लॅकमेल करता येणार नाही, अशा पद्धतीने पक्ष वाढवता येणार नाही. आता राहिलेलेही आमच्यासोबत येतील."

कोथळा काढणार म्हणाले, एक चापट तरी मारलीय का?

एकनाथ शिंदे म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांनी भाषणात माझ्या नातवावर टीका केली. पण त्याचा जन्म झाल्यानंतर तुमचं अध:पतन सुरू झालं. कुणावर टीका करायची, काय टीका करायची हे समजत नाही. पायाखालची वाळू सरकली आहे त्यांच्या. आमचे कोथळे काढणार असं ते म्हणाले, आयुष्यात कुणाला एक चापट तरी मारलीय का?"

तुमच्यामुळे मराठी माणूस मुंबईबाहेर गेला असा आरोप एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. ते म्हणाले की, "माझं कुटुंब माझी जबाबदारी ही घोषणा त्यांनी ज्यावेळी केली त्याचवेळी माझ्या लक्षात आलं. हम दो, हमारे दो अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली. परिवाराच्या पलिकडे जाऊन कुणाचाही विचार केला नाही."

महत्त्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election 2026: महायुतीचं विधानपरिषदेचं जागावाटप अंतिम टप्प्यात, फॉर्म्युला ठरला, कोणती जागा कोणाच्या वाट्याला?
महायुतीचं विधानपरिषदेचं जागावाटप अंतिम टप्प्यात, फॉर्म्युला ठरला, कोणती जागा कोणाच्या वाट्याला?
Monsoon Rain El NINO: महाराष्ट्रात यंदा कमी पाऊस पडणार, जून महिन्यात उष्णतेच्या लाटा; के.एस. होसाळीकरांनी काय-काय सांगितलं?
महाराष्ट्रात यंदा कमी पाऊस पडणार, जून महिन्यात उष्णतेच्या लाटा; के.एस. होसाळीकरांनी काय-काय सांगितलं?
Mumbai News: मुंबईच्या बीकेसीमधील 5 एकर जमिनीवर एमएमआरडीए अधिकाऱ्यांचा डोळा? वरुण सरदेसाई याचं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाले...
मुंबईच्या बीकेसीमधील 5 एकर जमिनीवर एमएमआरडीए अधिकाऱ्यांचा डोळा? वरुण सरदेसाई याचं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाले...
Cockroach Janata Party and Urban Naxal: कॉक्रोच जनता पार्टीला अर्बन नक्षलवाद्यांचा छुपा पाठिंबा? पोलिसांच्या गुप्तचर खात्याची करडी नजर, नेमकं काय घडलं?
कॉक्रोच जनता पार्टीला अर्बन नक्षलवाद्यांचा छुपा पाठिंबा? पोलिसांच्या गुप्तचर खात्याची करडी नजर, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : रिझर्व्ह बँक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, चलनातील नव्या नोटा खास पद्धतीने तयार होणार, ना पाण्यात भिजण्याचं टेन्शन ना फाटण्याची भीती
आरबीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, चलनातील नव्या नोटा खास पद्धतीने तयार होणार, ना पाण्यात भिजण्याचं टेन्शन ना फाटण्याची भीती
Vidhan Parishad Election 2026: महायुतीचं विधानपरिषदेचं जागावाटप अंतिम टप्प्यात, फॉर्म्युला ठरला, कोणती जागा कोणाच्या वाट्याला?
महायुतीचं विधानपरिषदेचं जागावाटप अंतिम टप्प्यात, फॉर्म्युला ठरला, कोणती जागा कोणाच्या वाट्याला?
Reel Star Mahesh Mote Toll Plaza Row: 'मी सामान्य माणूस नाही, रिल स्टार आहे... रिल स्टार'; टोलनाक्यावर महेश मोटेचा धिंगाणा, फुकटात कार सोडवण्यासाठी अरेरावी
'मी सामान्य माणूस नाही, रिल स्टार आहे... रिल स्टार'; टोलनाक्यावर महेश मोटेचा धिंगाणा, फुकटात कार सोडवण्यासाठी अरेरावी
IPL मध्ये मुंबई इंडियन्सचा डाऊनफॉल, दु:ख विसरण्यासाठी हार्दिक पांड्या गर्लफ्रेंड महिकासोबत रोमँटिक डेटवर, शर्टलेस PHOTOs शेअर
IPL मध्ये मुंबई इंडियन्सचा डाऊनफॉल, दु:ख विसरण्यासाठी हार्दिक पांड्या गर्लफ्रेंड महिकासोबत रोमँटिक डेटवर, शर्टलेस PHOTOs शेअर
Gold Silver Rate : सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांना धक्का, दोन दिवसांच्या घसरणीनंतर दर भडकले, सोनं 4 हजारांनी तर चांदी 5 हजारांनी महागली
सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांना धक्का, सोनं 4 हजारांनी तर चांदी 5 हजारांनी महागली, जाणून घ्या नवे दर
Monsoon Rain El NINO: महाराष्ट्रात यंदा कमी पाऊस पडणार, जून महिन्यात उष्णतेच्या लाटा; के.एस. होसाळीकरांनी काय-काय सांगितलं?
महाराष्ट्रात यंदा कमी पाऊस पडणार, जून महिन्यात उष्णतेच्या लाटा; के.एस. होसाळीकरांनी काय-काय सांगितलं?
Santosh Banger and Shrikant Shinde: शेळ्यांना बाजूला करा, वाघांना पुढे आणा! संतोष बांगरांनी श्रीकांत शिंदेंसमोर डरकाळी फोडली, हिंगोलीच्या सभेतील स्फोटक भाषण
शेळ्यांना बाजूला करा, वाघांना पुढे आणा! संतोष बांगरांनी श्रीकांत शिंदेंसमोर डरकाळी फोडली, हिंगोलीच्या सभेतील स्फोटक भाषण
Pimpri Chinchwad Alcohol news : तोंडातून फेस आला अन्...; पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 13 जणांचा बळी, विषारी स्पिरिटयुक्त दारू शहरभरात विकल्याची माहिती
तोंडातून फेस आला अन्...; पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 13 जणांचा बळी, विषारी स्पिरिटयुक्त दारू शहरभरात विकल्याची माहिती
Embed widget