Yashwant Jadhav : 48 तास उलटले; शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी अजूनही आयकर विभागाची छापेमारी सुरुच
Shivsena Corporator Yashwant Jadhav IT Raid : शुक्रवारी सकाळपासून शिवसेना नेते व मुंबई मनपा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरू झाली आहे.
Shivsena Corporator Yashwant Jadhav IT Raid : गेले 48 तास उलटूनही शिवसेना नेते व मुंबई मनपा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी माझगाव येथे आयकर विभागाची छापेमारी सुरूच आहे.. शुक्रवारी सकाळपासून आयकर विभागाची छापेमारी सुरू झाली आहे. दरम्यान, शिवसैनिकांनी काल आयकर विभागाच्या छापेमारीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. शिवसैनिकांनी आयकार विभागाचे छापेमारीचा निषेध केला आहे.
गेल्या 48 तासाहून अधिक काळ झाले आयकर विभागाचे अधिकारी यशवंत जाधव यांच्या घरी चौकशी करत आहेत. काल शिवसैनिक आक्रमक झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी त्यांना समजून शांत केले होते. रात्रीपासून शिवसैनिक यशवंत जाधव यांच्या घराबाहेर बसून आहेत. यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने शुक्रवारी सकाळपासूनच छापेमारी सुरू केली आहे.
यशवंत जाधव यांना घरातून बाहेर काढणार असल्याचं समजल्यावर शिवसैनिक मोठ्या संख्येने यशवंत जाधव यांच्या घराच्या बाहेर एकत्र झाले झाले होते. त्यामुळे माझगाव परिसरात पोलिस बंदोबस्त अधिक वाढवण्यात आला होता. आयकर विभागाला चौकशी करीत असताना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पोलिस बंदोवस्त ठेवण्यात आला आहे.
जानेवारी महिन्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. मुंबईतील कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तसेच यामध्ये मनी लॉन्ड्रिंग केल्याचा गंभीर आरोपही सोमय्यांनी जाधवांवर केला होता. एवढंच नाहीतर आयकर विभागाच्या हाती पुरावे लागले आहेत. जाधव यांचं पितळ उघडं करण्यासाठी आयकर विभागाला पाठपुराव्यास मदत करणार असल्याचंही किरीट सोमय्या म्हणाले होते. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले होते.
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांच्या निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या घरी आयकर विभागानं छापा टाकला आहे. यशवंत जाधव यांच्या माझगाव येथील घरी आयकर विभागानं छापा टाकला आहे. त्यामुळे या छापेमारीमध्ये यशवंत जाधव यांच्या घरातून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती काय लागते हे पाहणे महत्त्वाचे आहे.
कोण आहेत यशवंत जाधव?
- यशवंत जाधव यांचा 2002 साली तर त्यांच्या पत्नी यामिनी जाधव यांचा 2014 साली महापौर बनण्याची संधी थोडक्यात हुकली होती.
- दोन्ही वेळेला अनुसूचित जातीसाठी आरक्षण पडले असताना जाधव दाम्पत्याला संधी मिळू शकली नव्हती.
- यशवंत जाधव यांनी आतापर्यंत बाजार समितीचे आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद भुषविले आहे.
- आधी गटनेते आणि 2017 साली त्यांची सभागृह नेतेपदी निवड झाली होती.
- 2018 साली त्यांची स्थायी समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.
- त्यानंतर आतापर्यॅत स्थायी समितीपदावर विराजमान आहेत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha