एक्स्प्लोर
शिवसेना नगरसेवकावर पदाधिकाऱ्यांकडून प्राणघातक हल्ला
शिवाजीनगर पोलिसांच्या तपासाअंती ही घटना राजकीय, कौटुंबिक की मालमत्तेच्या वादातून झाली आहे हे समोर येईल.

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेचे पॅनल 20 चे शिवसेना नगरसेवक विकास पाटील यांच्यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून विकास पाटील यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार चालू आहेत.
उल्हासनगर महापालिका क्षेत्रात मोडणाऱ्या जुन्या अंबरनाथ गावात शिवसेनेचे अंबरनाथ उपशहरप्रमुख परशुराम पाटील राहतात. त्यांचे मोठा मुलगा विकास आणि लहान मुलगा आकाश हे दोघेही नगरसेवक आहेत. विकास हे रविवारी त्यांच्या मित्रांबरोबर काकोळे गावातील जीआयपी धरणावर फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी त्यांच्यावर जुना अंबरनाथ येथील शाखाप्रमुख जितू साळुंके आणि शिवसेनेचे गणेश पाटील यांच्यासह असलेल्या टोळक्याने धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला केला.
या हल्ल्यात विकास यांच्या हातावर आणि कानावर जखमा झाल्या असून हल्लेखोरांनी गाडीची तोडफोड केली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी गणेश पाटील याला अटक केली आहे. हा सर्व प्रकार राजकीय वैमनस्यातून झाला असल्याचा आरोप परशुराम पाटील यांनी केला आहे.
शिवाजीनगर पोलिसांच्या तपासाअंती ही घटना राजकीय, कौटुंबिक की मालमत्तेच्या वादातून झाली आहे हे समोर येईल.
पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
कोल्हापूर
पुणे
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
























