एक्स्प्लोर
अंगणवाडीसेविकांची घोषणाबाजी, उद्धव म्हणाले सरकारला मातांचे शाप लागतील!
अंगणवाडीसेविकांचं पगारवाढीसह इतर मागण्यासाठी सध्या मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे.
मुंबई: शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासमोर अंगणवाडी सेविकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
अंगणवाडीसेविकांचं पगारवाढीसह इतर मागण्यासाठी सध्या मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे.
या आंदोलनाला शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे. या अंगणवाडी सेविकांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे आले. त्यावेळी अंगणावाडी सेविकांनी त्यांच्या मागण्यांसाठी घोषणाबाजी केली.
यावेळी उद्धव ठाकरेंनीही सरकारवर जोरदार टीका केली. ज्या मातांचे आशिर्वाद घ्यायला पाहिजे, त्या मातांचे सरकारला शाप लागल्याशिवाय राहणार नाही, असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांचं भाषण
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “मी इथे नेतृत्त्व करायाला नाही, तर नेतृत्वाला ताकद द्यायला आलो आहे. तुम्ही आई बनून कुपोषित बालकांचं पालन पोषण करता. ज्या मातांचे आशीर्वाद घ्यायला पाहिजे, त्या मातांचे शाप लागल्याशिवाय राहणार नाही. खचून जाऊ नका, सरकारला नमवण्याची ताकद तुमच्यात आहे. अंगणवाडीसेविका ज्या दिशा ठरवतील त्यामध्ये शिवसेना सहभागी असेल”
यावेळी उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
“आमची मनं अजून जिवंत आहेत. मुर्दाड मनाने आम्ही कारभार करु शकत नाही. मुख्यमंत्रीसाहेब इकडे प्रतिष्ठेचा प्रश्न करू नका, इकडे लाडू द्या नाहीतर चिक्की द्या. लोकशाहीच्या नावाने जर तुम्ही ठोकशाही करणार असाल, तर हे मी चालू देणार नाही” असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
महाराष्ट्र
जळगाव
करमणूक
Advertisement