...तर विधानसभा निवडणुकीतही महायुतीला बहुमत मिळण्याची शक्यता, महाआघाडीला अवघ्या 56 जागा?
लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीतही शिवसेना-भाजप युतीला फायदा होण्याची शक्यता आहे.
मुंबई : लोकसभेत भाजपप्रणित एनडीएनं ऐतिहासिक विजय संपादन केला. एनडीएनं 352 जागांवर, तर एकट्या भाजपने 303 जागांवर विजय मिळवला. काही महिन्यात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तोपर्यंत जनतेचा कल तसाच राहिला तर विधानसभेचा निकाल लोकसभेप्रमाणेच महायुतीच्या बाजूनं लागू शकतो.
मुंबईतील लोकसभेच्या सहाही मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. या सर्व उमेदवारांची विधानसभा मतदार संघातही चलती राहिली आहे. 36 पैकी तब्बल 31 मतदार संघात महायुतीला बहुमत मिळाले आहे. तर अवघ्या 5 मतदार संघात काँग्रेसने आघाडी घेतली आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत मुंबईत महायुतीच्या जागा वाढण्याची शक्यता आहे.
राज्यातील लोकसभेच्या 48 जागांचा विचार केला तर भाजप-शिवसेना युतीने 41 जागा जिंकल्या. त्यामध्ये भाजप 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी 5 तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने प्रत्येकी एक जागा जिंकली. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीतही शिवसेना-भाजप युतीला फायदा होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील अंदाज (288 जागा)
शिवसेना-भाजप युती - 226 काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी - 56 इतर- 6
मुंबई (36 जागा)
भाजप-शिवसेना - 31 काँग्रेस-राष्ट्रवादी - 3 समाजवादी पार्टी - 1 एमआयएम - 1
कोकण (36 जागा)
भाजप-शिवसेना - 27 काँग्रेस-राष्ट्रवादी (बहुजन विकास आघाडीसह) - 8 महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष- 1
मराठवाडा (48 जागा)
भाजप-शिवसेना - 39 काँग्रेस-राष्ट्रवादी - 6 वंचित बहुजन आघाडी-एमआयएम - 2 अपक्ष - 1
विदर्भ (60 जागा)
भाजप-शिवसेना - 49 काँग्रेस-राष्ट्रवादी-स्वाभिमानी - 11
उत्तर महाराष्ट्र (36 जागा)
भाजप-शिवसेना - 31 काँग्रेस-राष्ट्रवादी-स्वाभिमानी - 5
पश्चिम महाराष्ट्र (72 जागा)
भाजप-शिवसेना - 49 काँग्रेस-राष्ट्रवादी - 23