एक्स्प्लोर

Shivsena on BJP MNS: मनसेला भाजपचे उपवस्त्र संबोधत शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

Shivsena on BJP MNS : शिवसेनेने भाजप आणि मनसेवर बोचरी टीका केली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. त्याला आज सामनातून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

Shivsena on BJP MNS : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी मशिद पाडल्याच्या मुद्यावरून शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आल्यानंतर शिवसेनेने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपवर हल्लाबोल करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला उपवस्त्र म्हणत बोचरी टीका केली आहे. बाबरी आम्हीच पाडली असे सांगणाऱ्यांना देशात घुसलेल्या चिनी सैनिकांना बाहेर ढकलता येत नसल्याचे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. मशिदीवरील बेकायदेशीर भोंगे हा राष्ट्रीय प्रश्न आहे व त्यावर केंद्र सरकारला एक धोरण आखावे लागेल. बेकायदेशीर काही होत असेल तर ते रोखणे हे राज्य सरकारचे काम असल्याचेही शिवसेनेने म्हटले. 

रविवारी, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा पार पडली होती. फडणवीस यांनी आपल्या भाषणात शिवसेनेवर टीकास्त्र सोडले होते. भोंगे काढायला सांगितले तर ह्यांची हातभर फाटली आणि हे म्हणतात बाबरी आम्ही पाडली अशा शेलक्या शब्दात फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली होती. तर, राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या मुद्यावरून राज्य सरकारला आव्हान दिले होते.

देवेंद्र फडणवीस यांच्या बोचऱ्या टीकेला सामनातून शिवसेनेने उत्तर दिले आहे. सामनाच्या अग्रलेखात म्हटले की, लोक श्रीरामाचे भजन करतात. भाजपवाले आता ऊठसूट बाबराचे भजन करू लागले आहेत. हा बदल बरा नाही. धमक्या व इशारे देण्यापेक्षा तुम्ही चीनला का व कसे घाबरताय त्यावर बोला असे आवाहन शिवसेनेने केले.  बाबरी आम्हीच पाडली असे सांगणाऱ्यांना देशात घुसलेल्या चिनी सैनिकांना बाहेर ढकलता येत नाही. चीननेही गलवान व्हॅलीत 23 भोंगे लावले आहेत व ते देशाला आव्हान देत आहेत की, ''आम्ही येथून बाहेर पडणार नाही!'' मग ते भोंगेही उतरवा व चिन्यांनाही हाकला. तरच तुम्ही हिमतीचे असल्याचे शिवसेनेने म्हटले. 

मनसेवर बोचरी टीका 

सामनाने अग्रलेखात म्हटले की, महाराष्ट्र दिनी भारतीय जनता पक्ष व त्यांच्या उपवस्त्र पक्षाने सभा घेतल्या. दिशादर्शक असे प्रेरक विचार त्या सभेतून राज्याला मिळतील असे वाटले होते, पण मुख्य पक्ष व त्यांच्या उपवस्त्राने लाथा झाडण्याशिवाय काहीच केले नाही. त्यामुळे गदाधारी कोण आणि 'गधा'धारी कोण हे महाराष्ट्र दिनी स्पष्ट झाले. भाजपच्या बुस्टर डोस सभेत देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेवर तुटून पडले, तर संभाजीनगरच्या सभेत त्यांचे उपवस्त्र शरद पवारांवर तुटून पडले. हे ठरवून झाले. त्यातून महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या जनतेला काय मिळाले? असा सवालही शिवसेनेने केला. उपवस्त्राला बुस्टर देण्याचे काम मुंबईतूनच सुरू होते. पण भाजपाससुद्धा बुस्टर डोसची गरज आहे. बाबरीचा ढाचा या विषयावर आपले विरोधी पक्षनेते इतके बोलले की, जणू देशात आता कोणतेच विषय शिल्लक राहिलेले नाहीत,असेही शिवसेनेने म्हटले. 

संभाजीनगरात भाजपच्या उपवस्त्राने सांगितले, 'मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढा, नाही तर आम्ही थांबणार नाही.' उपवस्त्रांना आता उत्तर प्रदेशच्या प्रेमाचे जे अजीर्ण झाले आहे ते गमतीशीर आहे. आधी त्यांना उत्तर प्रदेश व तेथील लोक नजरेसमोर नको होते. हिंदी पट्टय़ातील लोक हिंदुस्थानात राहायलाच लायक नाहीत, असेच त्यांचे म्हणणे होते. योगी आदित्यनाथ यांना कळत नाही. डोक्याचा तुळतुळीत गोटा केलेला एक माणूस भगवे कपडे घालून फिरतोय. हे किळसवाणे असल्याचे त्यांचे मत होते. आता अचानक हा 'गोटा' त्यांना प्रिय झाला व हिंदी भाषिक मंडळींना चुचकारण्याचे काम सुरू झाले. हे मतपरिवर्तन झाले त्यामागे नक्की कोणता व्यवहार आहे ते पाहावे लागेल असा टोलाही शिवसेनेने लगावला. 

भोंग्यांच्या प्रश्नावर भाजपच्या उपवस्त्रांना दोन सभा घ्याव्या लागतात, लोकांना भडकविण्याची भाषा करावी लागते. म्हणजे भाजपास वैफल्याने ग्रासले आहे व फक्त धार्मिक तणाव निर्माण करायचा आहे. हिंदू-मुसलमानांतील दंग्यांनी आजवर दोन्ही बाजूचे प्रचंड नुकसान झाले आहे. संभाजीनगरपासून मुंबईपर्यंत शिवसेना हिंदुत्व रक्षणाची ढाल म्हणूनच वावरली आहे, पण या लढाईत भाजप व त्यांची आजची उपवस्त्रे कोठे होती? आता या मंडळींना हिंदू हिंदूंतच दंगली पेटवायच्या आहेत. मुंबईत मराठी माणसांत फूट पाडण्याचे प्रयत्न झाले, ते यशस्वी झाले नाहीत. आता हिंदूंनाच एकमेकांविरुद्ध मैदानात उतरवायचे हा कावा स्पष्ट दिसत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. 

उपवस्त्र म्हणजे काय?

श्रीधर गणेश वझे यांच्या आर्यभूषण स्कूल डिक्शनरीनुसार उपवस्त्र याचा अर्थ a A cloth worn loosely over the shoulders; a kept mistress (ठेवलेली बाई) असा आहे.  तर, Educalingo या शब्दकोशानुसार उपवस्त्र या शब्दाचा अर्थ गवस्त्र; उपरणें; पांघरावयाचें वस्त्र, रखेली असा आहे. शब्दकोशात अंगवस्त्र आणि उपवस्त्र हे दोन्ही समानअर्थी शब्द दाखवले आहे. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget