एक्स्प्लोर

शिवसेनेचा हल्लोबाल! एकनाथ शिंदेंना बाबा 'योगराज'ची उपमा; गुवाहाटीत योग शिबिरातील आमदारांना अन्नातून अफू गांजा...

Shiv Sena Saamana on BJP : सामनाच्या अग्रलेखात शिवसेनेनं भाजपवर जोरदार टीका केली आहे. एकनाथ शिंदेंना बाबा 'योगराज' असं संबोधत त्यांच्यावरही टीकेची झोड उठवली आहे.  

Shiv Sena Saamana on BJP : गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेल्या घडामोडीनंतर राज्याच्या राजकारणाला एक वेगळं वळण मिळालं आहे. अशात आज सामनाच्या अग्रलेखात शिवसेनेनं भाजपवर जोरदार टीका केली आहे. शिवाय एकनाथ शिंदेंना बाबा 'योगराज' असं संबोधत त्यांच्यावरही टीकेची झोड उठवली आहे. गुवाहाटीच्या ध्यान शिबिरात जे लोक पळवून, मारून बसवले आहेत, त्यांचा संबंध योगाशी नसून भोगाशी आहे. अशाच भोग्यांना हाताशी धरून भाजप स्वतःला महाशक्ती म्हणून मिरवत आहे, अशी टीका लेखात करण्यात आली आहे. योग शिबिरातील आमदारांना अन्नातून अफू-गांजा मिसळून दिला जात असावा आणि त्याच गुंगीत आणि  धुंदीत ते बोलत आणि डोलत आहेत असे दिसते. भाजप ही महाशक्ती वगैरे असल्याचे ज्यांना आता नव्याने उमजू लागले, त्यांनी कश्मिरी पंडितांच्या हत्येचा जाब गुवाहाटीच्या योग शिबिरातच विचारायला हवा, पण एका अर्थाने भाजप म्हणजे खरोखरच महाशक्ती आहे हे मानावेच लागेल. 

लेखामध्ये पुढं म्हटलं आहे की, 'रॅडिसन ब्लू' या योग शिबिराचे दरवाजे-खिडक्या बंद आहेत. मोकळी हवा येत नाही आणि शिबिरार्थी झापडबंद अवस्थेत पडले आहेत. त्यामुळे कश्मिरी पंडितांवरील अत्याचाराचा आक्रोश त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. योग शिबिरात सामील झालेल्या किमान सात-आठ जणांवरचे 'ईडी-पीडी' बालंट त्यांनी चुटकीसरशी दूर केले. त्यामुळे हे सात-आठ शिबिरार्थी महाशक्तीचे एकदम चरणदास झाले. भारतीय जनता पक्षाचा उल्लेख महाशक्ती असा केला ते खरेच आहे. काही जणांची 'ईडी-पीडी' त्यांनी दूर केली. तसेच काही जणांना 'ईडी'ची पीडा होईल असे सांगून गुवाहाटीच्या योग शिबिरात जबरदस्तीने भरती केले. त्यामुळे तेथे नक्की कोणत्या प्रकारचे योग सुरू आहेत त्याची कल्पना यावी. मोदी आपले आदरणीय पंतप्रधान आहेत. योग प्रचारात त्यांचे मोठेच योगदान आहे. अनेकदा ते केदारनाथास जाऊन ध्यान व चिंतन करतात, पण गुवाहाटीचे ध्यान व चिंतन वेगळे आहे. गुवाहाटीच्या ध्यान शिबिरात जे लोक पळवून, मारून बसवले आहेत, त्यांचा संबंध योगाशी नसून भोगाशी आहे. अशाच भोग्यांना हाताशी धरून भाजप स्वतःला महाशक्ती म्हणून मिरवत आहे व भाडोत्री लोकांना पकडून त्यांच्या तोंडून स्वतःच्या 'महान'पणाचा गजर करून घेत आहेत, असं लेखामध्ये म्हटलं आहे. 

सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय की, महाशक्तीच्या सहकार्याने गुवाहाटीमधील बाबा 'योगराज' हे ठाकरे सरकार घालविण्यासाठी ध्यानसाधना करीत आहेत. एक मात्र नक्की, गुवाहाटीच्या योग शिबिरामुळे देशातला संपूर्ण विरोधी पक्ष एकवटला आहे. एनकेनप्रकारे सत्ता स्थापन करायचीच, माणसे फोडायची, विकत घ्यायची, आमदारांचा बाजार भरवायचा या प्रवृत्तीविरोधात देश एकवटत आहे. त्यातूनच नव्या लढ्याची तेजस्वी किरणे बाहेर पडतील. जग उगवत्या सूर्याला नमस्कार करते, पण गुवाहाटीच्या योग शिबिरात सर्वच बाबतीत अंधकार आहे, असंही लेखात म्हटलं आहे. 

पाकिस्तानला खरेच धडा शिकविला असता तर काश्मीरच्या भूमीत हिंदू रक्ताचे पाट वाहताना दिसले नसते

लेखात म्हटलं आहे की, महाराष्ट्राचेच नव्हे, तर अखिल हिंदुस्थानचे डोळे ज्याकडे लागले होते ते कार्य पूर्ण होताना दिसत आहे. सुरतच्या 'मेरिडिअन' हॉटेलमध्ये अर्धवट राहिलेले 'चिंतन' कार्य अखेर ईशान्येकडील गुवाहाटी शहरात मार्गी लागले. गुवाहाटीस्थित 'रॅडिसन ब्लू' योग शिबिरात महाराष्ट्रातील चाळिसेक आमदारांचे सखोल चिंतन शिबीर सुरू आहे. त्या शिबिरात असा ठराव संमत झाला की, ''भारतीय जनता पक्ष एक महाशक्ती आहे. ही महाशक्ती आपल्या पाठीशी असल्याने आपल्याला चिंता नाही.'' आसामच्या योग शिबिरात जे चाळिसेक योगार्थी आहेत ते कोण आणि कोठून आले, ते आता अखिल हिंदुस्थानास समजले. शिवसेनेचे पळवून नेलेले चाळिसेक आमदार गुवाहाटीमध्ये असून त्यांची चोख व्यवस्था भारतीय जनता पक्षाने केल्याने या महाशक्तीचा काही जणांना नव्याने साक्षात्कार झालेला दिसतो. योग शिबिराच्या प्रमुखांनी त्यांची भूमिका अधिक सुस्पष्ट करताना जाहीर केले की, ''भाजप या महाशक्तीने पाकिस्तानला धडा शिकवला आहे. त्या महाशक्तीचा आपल्याला पाठिंबा आहे.'' आसामातून अनेक दिव्य विचार सध्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचत आहेत. हिंदुत्वापासून स्वाभिमानापर्यंत नव्याने साक्षात्कार होत आहेत. बरं, या महाशक्तीने पाकिस्तानला धडा शिकविला म्हणजे काय केले? योग शिबिरातील मंडळींना पाकिस्तानबाबत जे ज्ञान मिळत आहे, त्यावर काय बोलावे? पाकिस्तानची जिरवली किंवा पाकिस्तानला धडा शिकवल्याचे कोणते नवे पुरावे गुवाहाटीच्या योग शिबिरात समोर आणले? कश्मीरात पाकिस्तानची घुसखोरी कायम आहेच, पण मोठ्या प्रमाणात हिंदू पंडितांचे हत्याकांड सुरू आहे. हिंदूंनी पलायन केले आणि जाताना भारतीय जनता पक्षाला शाप दिले. स्वतःस हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे सरकार दिल्लीत असताना कश्मीरमधून हिंदूंना पलायन करावे लागते, हीच काय तुमची महाशक्ती? पाकिस्तानला खरेच धडा शिकविला असता तर काश्मीरच्या भूमीत हिंदू रक्ताचे पाट वाहताना दिसले नसते, असं लेखात म्हटलं आहे. 

महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ करण्याचे कारस्थान 

भाजपने पाकिस्तानला धडा शिकविला असे गुवाहाटीच्या योग शिबीरप्रमुखांना वाटत असेल तर मग हाच धडा त्यांच्या नव्या महाशक्तीने लडाखमध्ये घुसून आपली हजारो वर्ग किलोमीटर जमीन बळकावणाऱया चीनला का शिकवू नये? महाशक्तीला ते सहज शक्य आहे. महाशक्ती रशिया-युक्रेन युद्धात मध्यस्थीचा आव आणते, पण आपल्याच देशात ज्या असंख्य प्रश्नांचा धुमाकूळ सुरू आहे, त्याबाबत सोयिस्कर मौन बाळगते. 'अग्निवीर' भरती प्रकरणात अनेक राज्यांत तरुणांनी तीव्र आंदोलने केली. त्यात महाशक्तीला मध्यस्थी करता आली नाही. महाराष्ट्र या काळात स्थिर आणि शांत राहिला तो मुख्यमंत्री ठाकरे यांच्या संयमी नेतृत्वामुळेच, पण महाशक्तीच्या सहकार्याने गुवाहाटीमधील बाबा 'योगराज' हे ठाकरे सरकार घालविण्यासाठी ध्यानसाधना करीत आहेत. त्यांनी द्वेषाचे अग्निकुंड पेटवले आहे. त्यात महाशक्तीच्या समिधा पडत आहेत. महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ करण्याचे हे कारस्थान आहे. जेथे हे योग शिबीर सुरू आहे, त्या आसाम राज्यात पुराने-प्रलयाने हाहाकार माजवला आहे. लोक हवालदिल आहेत, पण आसामच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांची सारी साधना 'रॅडिसन ब्लू' या योग शिबिरासाठी खर्ची घातली आहे. हे असे कोण तपस्वी आहेत की, त्यांना फलप्राप्ती व्हावी म्हणून 'महाशक्ती'ने सर्व ताकद पणाला लावली आहे? पाकिस्तानच्या कुरापतींनी कश्मीरातील पंडित मरणयातना भोगत आहेत. त्यावर योग शिबिरात कुणाचे 'ध्यान' दिसत नाही. एक मात्र नक्की, गुवाहाटीच्या योग शिबिरामुळे देशातला संपूर्ण विरोधी पक्ष एकवटला आहे, असं शेवटी लेखात म्हटलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget