एक्स्प्लोर

ऑपरेशन करायला वाघाचं काळीज लागतं लांडग्याचं नाही, डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन करतो, एकनाथ शिंदेंचा घणाघात

डॉक्टर नसलो तरी मी ऑपरेशन करतो. ऑपरेशन करायला वाघाचं काळीज लागतं लांडगग्याचं नाही. वाघाचं कातडी पांघरुन वाघ होता येत नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटावर टीका केली.

Eknath Shinde :  डॉक्टर नसलो तरी मी ऑपरेशन करतो. ऑपरेशन करायला वाघाचं काळीज लागतं लांडगग्याचं नाही. वाघाचं कातडी पांघरुन वाघ होता येत नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार टीका केली. त्यांच्याकडे काटे आणि चमचे आहेत. कसा वाढणार पक्ष. त्यांना आठवण करुन द्या की आता परिस्थिती बदलली आहे, त्यानुसार चालायचं असतं. मी कोण आहे. मी मी मी नाही आम्ही म्हणा. मी मी म्हणणाऱ्या रावणाची लंका जळून खाक झाली. जनता जनादर्न सगळी आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

हिंमत असेल तर समोर या, शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवतील का?

चार वर्षापूर्वी याच लांडग्यांनी मला धमक्या दिल्या होत्या. मुंबईत तर यावचं लागेल. वरळीतून जावचं लागेल. अरे कुणाची काय जहागिरी आहे का मुंबई. एकनाथ शिंदे एकटा आला. हेलिकॉप्टरने नाही तर गाडीतून आलो. बाय रोड गेलो. वरळीतून गेलो, तिथे थांबलो. तेव्हा मक्या देणारे ऑनलाईन बघत होते. हे काय मला चॅलेंज देणार. आता म्हणतात तुडवा, हिंमत असेल तर समोर या म्हणावं. रामदास भाई म्हणाले की, शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवतील का? असे शिंदे म्हणाले. सकाळी खासदारांना शिव्या द्यायच्या आणि संध्याकाळी त्यांना चांगल म्हणायचं हे काय चाललयं असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

एकनाथ शिंदे हा तुमच्यासमोर येऊन छातीचा कोट करुन लढणारा 

तुम लढो हम कपडे सांभालते है असे म्हणणारा एकनाथ शिंदे नाही. तुमच्यासमोर येऊन छातीचा कोट करुन लढणारा एकनाथ शिंदे आहे,. हा लढवय्या आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले. माहापालिका गेल्या जिल्हा परिषदा गेल्या ग्रामपंचायती गेल्या म्हणाले आम्हाला वाऱ्यावर सोडलं आहे. मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून जोर लावला, पण तुम्ही आम्हाला साथ दिल्याचे शिंदे म्हणाले. मुंबईत क्रॉक्रिंटचे रस्ते करण्याचा निर्णय घेतला. 250 आपला दवाखाना काढला. मेट्रो सरु केला, अटल सेतू. कोस्टल सुरु केला, समृद्धी महामार्ग सुरु केला. त्यामुळं मुंबईकरांनी महायुतीला भरभरुन दिलं विजयी केलं. ज्यांनी 25 वर्ष मुंबईला सोन्याची अंड देणारी कोंबडी म्हणून वापरलं त्यांना जनतेनं घरी बसवलं अशी टीका एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर टीका केली.

जो भगव्याला विसरला तो राजकारणातून संपला

शिवसेना म्हणजे भगवं वादळ आहे. जो भगव्याला विसरला तो राजकारणातून संपल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. बाळासाहेंबाना ज्यांचा तिसरस्कार होता त्यांचा तुम्ही जयजयकार करता अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली. आम्ही शिवसेना पुढे नेण्याचं काम केलं त्यांना तुम्ही शिव्या देताय. आपला उठाव सुपरहीट झाला. जनतेनी स्वीकारल्याचे शिंदे म्हणाले. आम्ही जनतेच्या न्यायालयात जिंकलो असे शिंदे म्हणाले. उठाव केला तेव्हा म्हणाले कोणीही निवडून येणार नाही सोबत राहणार नाही. पण मी म्हणालो होत एकही निवडून नाही आलो तर राजकारण सोडून देईन आणी गावाकडे शेती करायला जाईन. पण आपण 60 आमदार निवडून आणल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget