एक्स्प्लोर
Advertisement
घटनादुरुस्तीतून समाजाला खुश करण्याचा प्रश्नच नाही : पवार
घटनादुरुस्तीतून समाजाला खुश करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, ही प्रतिक्रिया शरद पवार यांनी भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावर दिली.
मुंबई : घटनादुरुस्तीतून समाजाला खुश करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावर पवारांनी ही प्रतिक्रिया दिली.
मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्ती करा, त्यासाठी सर्व विरोधकांना एकत्र आणण्याची जबाबदारी मी उचलेन, अशी हमीसुद्धा पवारांनी सरकारला दिली आहे. सरकार एकदम निर्णय घेऊ शकतं. घटना बदल करण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे. म्हणून संसदेत जाऊन यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न असल्याचंही पवारांनी सांगितलं.
घटनादुरुस्ती नेमकी कशी होईल, हे पवारांनी स्पष्ट करावं, असं प्रकाश आंबेडकर नाशिकमध्ये म्हणाले होते. घटनादुरुस्ती कशी होईल हे पवारांनी न सांगितल्यास केवळ मराठा समाजाला खुश करण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केलं होतं, असा त्याचा अर्थ निघेल, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.
'काल विधीमंडळात सर्वपक्षीय बैठक झाली आणि कायदेशीर अडचणी दूर करण्याचा दृष्टीने एकत्र पाऊल पुढे टाकण्याचं ठरवण्यात आलं. तो निर्णय यशस्वी कसा होईल, हे पाहणं आमचं काम आहे. ते जर होऊ शकलं तर हा प्रश्न सुटेल, त्या कामाला अधिक प्राधान्य देणे मला महत्त्वाचे वाटते.' असे पवार म्हणाले.
'आम्ही आरक्षण दिलं, निर्णय घेतला, हे गडकरी विसरले. महाराष्ट्रात आघाडी सरकार असताना निर्णय राबवला, आरक्षण दिलं,
लोकांना नोकऱ्या मिळाल्या. पण काही जण कोर्टात गेले आणि निर्णयाला स्थगिती मिळाली. गडकरी हे उत्तम काम करतात याची मला कल्पना आहे आणि आनंद आहे. मात्र त्यांनी असं काही राजकीय विधान केलं, तर ते अशोभनीय आहे. असे काही निर्णय महाराष्ट्रात घेतले गेले याचं स्मरण त्यांना नाहीये' अशा शब्दात पवारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनाही टोला लगावला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सोलापूर
क्रीडा
Advertisement