लोकसभा जिंकण्यासाठी 3 राज्यात भाजपनं स्वतःचा पराभव करुन घेतला असावा, शरद पवारांना शंका
ईव्हीएम मशीन आणि त्यांच्या संख्येबाबत माझ्या मनात फार आधीपासून शंका होती. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड येथे भाजपची सत्ता असताना भाजपाचा पराभव झाला आणि काँग्रेस विजयी झाला.

मुंबई : मुंबईत शनिवार पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर शरद पवारांनी ट्विटरवर पोस्ट लिहीत ईव्हीएम मशीनबाबत पुन्हा संशय व्यक्त केला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपची सत्ता असतानाही काँग्रेसने विजय मिळवला आणि लोकसभा निवडणुकीत त्याच ठिकाणी भाजपला घवघवीत यश मिळालं. त्यामुळे देशाच्या निवडणुका जिंकण्यासाठी तर हा पराभव घडवून आणला नाही ना, अशी शंका मनात निर्माण झाल्याचं शरद पवारांनी म्हटलं.
ईव्हीएम मशीन आणि त्यांच्या संख्येबाबत माझ्या मनात फार आधीपासून शंका होती. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड येथे भाजपची सत्ता असताना भाजपाचा पराभव झाला आणि काँग्रेस विजयी झाला. पण कदाचित हा पराभव देशाच्या निवडणुका जिंकण्यासाठी तर नाही, अशी शंका माझ्या डोक्यात आली होती. ही तिन्ही राज्ये एकमेकांना लागून आहेत आणि आता तेथील तत्कालीन सरकार भाजपा पाडण्याच्या विचारात आहे, असं शरद पवारांना म्हटलं.
ईव्हीएम मशीन आणि त्यांच्या संख्येबाबत माझ्या मनात फार आधीपासून शंका होती. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड इथे भाजपची सत्ता असताना भाजपाचा पराभव झाला आणि काँग्रेस पार्टी विजयी झाली. पण कदाचित हा पराभव देशाच्या निवडणुका जिंकण्यासाठी तर नाही, अशी शंका माझ्या डोक्यात आली होती. pic.twitter.com/NishwWZJ7h
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 1, 2019
निवडणूक यंत्रणेबाबत निवडणुकीत कधी नव्हे तितका विचार करण्यात आला. आपलं मत बरोबर गेलं की नाही त्याबाबत लोकांना शंका वाटत आहे. देशात लोकांच्या मनात अशी शंका याआधी कधी निर्माण झाली नव्हती. आजही लोकांची शंका कायम आहे, असं शरद पवारांना सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
