एक्स्प्लोर

Seat Belt: चारचाकी वाहनांमध्ये सीटबेल्ट लावण्यासाठी आज अखेरचा दिवस, सीटबेल्ट नसल्यास होणार दंडात्मक कारवाई

मोटार वाहन (सुधारणा) कायदा, 2019च्या कलम 194 (ब) (1) नुसार मोटर वाहन चालकाने सुरक्षा बेल्टशिवाय वाहन चालवल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसंच सहप्रवाशांनाही सुरक्षा बेल्ट लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

 Mumbai Seat Belt New Rule: चारचाकी वाहनांतून  मागच्या सीटवर प्रवास करणाऱ्या उद्यापासून ( 1 नोव्हेंबर) सीट बेल्टची (Seat Belt) सक्ती करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांनी काढले आहेत. ज्या वाहनांमध्ये मागील सीटवर सीटबेल्टची व्यवस्था नाही अशा वाहनांना सीटबेल्ट बसवता यावा यासाठी पोलिसांनी दिलेली 15 दिवसांची मुदत  आज संपत आहे. सीटबेल्ट बसवले नसल्यास उद्यापासून दंडात्मक कारवाई होणार आहे.

कारच्या मागील आसनांवर बसणाऱ्या प्रवाशांना सीट बेल्ट लावणं बंधनकारक असेल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. मोटार वाहन (सुधारणा) कायदा, 2019च्या कलम 194 (ब) (1) नुसार मोटर वाहन चालकाने सुरक्षा बेल्टशिवाय वाहन चालवल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसंच सहप्रवाशांनाही सुरक्षा बेल्ट लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. सर्व प्रवाशांसाठी सीट बेल्टची सुविधा नसलेल्या मोटार वाहनांमध्ये सर्व प्रवाशांसाठी सीट बेल्टची सुविधा उपलब्ध करण्यासाठी 1 नोव्हेंबर, 2022 पर्यंत कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर चालक अथवा सहप्रवाशांनी सुरक्षा बेल्ट न लावता प्रवास केल्यास चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

काळी-पिवळी टॅक्सीचालकांनी या नियमाला विरोध दर्शवला आहे.  "काळ्या-पिवळ्या टॅक्सी या मुंबई महानगरातच अधिक धावतात. त्यातून प्रवास करणारा प्रवासी हा कमी अंतरावरील असतो. काळी-पिवळी टॅक्सीचालकांना चार प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी आहे. मात्र पाठीमागे तीन प्रवासी बसत असल्याने तसंच कार उत्पादकांनी मागच्या दोनच सीटना सीट बेल्टची सुविधा दिल्याने तिसरा प्रवासी सीट बेल्ट लावू शकत नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी टॅक्सीची खासगी कारसोबत तुलना करु नये, असं मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने वाहतूक विभागाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

सीटबेल्ट वापरल्यामुळे अपघातात मृत्यूची शक्यता 45 टक्क्यांनी कमी होते. सायरस यांच्या अपघातामुळे सरकारने मागे बसलेल्या प्रवाशांसाठी सीट बेल्ट अलर्ट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मागे बसलेल्या प्रवाशांनी सीट बेल्ट घातला नसेल तर अलर्ट वाजला जाईल. ड्रायव्हर आणि समोरच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीने सीट बेल्ट लावला नाही तर त्यासाठी दंडाची तरतूद आहे. मात्र मागे बसलेल्या प्रवाशांना सीट बेल्ट न लावल्याबद्दल दंडही भरावा लागणार आहे. हे सर्व कारसाठी लागू होणार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar In Baramati  Loksabha Election 2024: 'हुकूमशाही करणाऱ्याला खड्यासारखे बाजूला काढू'; शरद पवारांची तोफ धडाडली, लेकीसाठी उतरले मैदानात!
'हुकूमशाही करणाऱ्याला खड्यासारखे बाजूला काढू'; शरद पवारांची तोफ धडाडली, लेकीसाठी उतरले मैदानात!
Chhagan Bhujbal : 'मतदानाच्या दिवसापर्यंत तरी नाशिकच्या जागेवर उमेदवार जाहीर करा', भुजबळांचा महायुतीला खोचक टोला
'मतदानाच्या दिवसापर्यंत तरी नाशिकच्या जागेवर उमेदवार जाहीर करा', भुजबळांचा महायुतीला खोचक टोला
Vishwajeet Kadam : आमदार विश्वजित कदमांनी चंद्रहार पाटलांना घेऊन सुरू केला प्रचार; तिरंगी लढतीवर काय म्हणाले?
आमदार विश्वजित कदमांनी चंद्रहार पाटलांना घेऊन सुरू केला प्रचार; तिरंगी लढतीवर काय म्हणाले?
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या 'या' पाच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस; तुम्ही पाहिलेत का 'हे' सिनेमे?
अमिताभ बच्चन यांच्या 'या' पाच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस; तुम्ही पाहिलेत का 'हे' सिनेमे?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ramdas Kadam On Uddhav Thackeray : मुलाला वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे मोदींना गुपचूप भेटायचेVijay Shivtare : बारामतीमध्ये सुनेत्रा पवार मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील : विजय शिवतारेPrakash Shendge-Manoj Jarange : सांगलीत प्रकाश शेंडगेंच्या वाहनावर शाईफेक ; पोलिसांत तक्रार दाखल करणारRajvardhan singh kadambande : आताचे शाहू महाराज केवळ संपत्तीचे  वारसदार : राजवर्धनसिंह : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar In Baramati  Loksabha Election 2024: 'हुकूमशाही करणाऱ्याला खड्यासारखे बाजूला काढू'; शरद पवारांची तोफ धडाडली, लेकीसाठी उतरले मैदानात!
'हुकूमशाही करणाऱ्याला खड्यासारखे बाजूला काढू'; शरद पवारांची तोफ धडाडली, लेकीसाठी उतरले मैदानात!
Chhagan Bhujbal : 'मतदानाच्या दिवसापर्यंत तरी नाशिकच्या जागेवर उमेदवार जाहीर करा', भुजबळांचा महायुतीला खोचक टोला
'मतदानाच्या दिवसापर्यंत तरी नाशिकच्या जागेवर उमेदवार जाहीर करा', भुजबळांचा महायुतीला खोचक टोला
Vishwajeet Kadam : आमदार विश्वजित कदमांनी चंद्रहार पाटलांना घेऊन सुरू केला प्रचार; तिरंगी लढतीवर काय म्हणाले?
आमदार विश्वजित कदमांनी चंद्रहार पाटलांना घेऊन सुरू केला प्रचार; तिरंगी लढतीवर काय म्हणाले?
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या 'या' पाच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस; तुम्ही पाहिलेत का 'हे' सिनेमे?
अमिताभ बच्चन यांच्या 'या' पाच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस; तुम्ही पाहिलेत का 'हे' सिनेमे?
Thane Loksabha 2024: प्रताप सरनाईक, मीनाक्षी शिंदे नव्हे, ठाण्यातून एकनाथ शिंदेंचा हुकमी एक्का मैदानात; नाव जवळपास निश्चित, लवकरच घोषणा
सरनाईक, मीनाक्षी शिंदे नव्हे, ठाण्यातून एकनाथ शिंदेंचा हुकमी एक्का मैदानात; नाव जवळपास निश्चित
'आदित्यला वाचवण्यासाठी मोदींना मागच्या दाराने भेटायचे, आता त्यांनाच शिव्या देताय', रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
'आदित्यला वाचवण्यासाठी मोदींना मागच्या दाराने भेटायचे, आता त्यांनाच शिव्या देताय', रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
Chhagan Bhujbal: मनोज जरांगे हा पंतप्रधान मोदींपेक्षा मोठा नेता आहे का? छगन भुजबळांनी फटकारलं
मनोज जरांगे हा पंतप्रधान मोदींपेक्षा मोठा नेता आहे का? छगन भुजबळांनी फटकारलं
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील सोढी बेपत्ता; मालिकेची टीम म्हणते...
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील सोढी बेपत्ता; मालिकेची टीम म्हणते...
Embed widget