एक्स्प्लोर
VIDEO: महागड्या साड्या चोरणाऱ्या महिला सीसीटीव्हीत कैद
बदलापूर: बायकांना साड्यांची आवड किती असते हे खरं तर सांगण्याची गरज नाही. पण याच हौसेपोटी बायका कोणत्या थराला जाऊ शकतात. याचा प्रत्यय बदलापुरात आला. बदलापूर शहरातील साड्यांच्या दुकानात तीन महिलांनी महागड्या साड्या चोरल्या आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बदलापूर शहरातील स्टेशन पाडा भागातील नुपूर या साडीच्या दुकानातून तब्ब्ल ७७ हजार रुपयांच्या ८ महागड्या साड्या हातचालाखी करून लंपास केल्या, काल सकाळी १० सुमारास हा प्रकार घडला.
तीन महिला साड्या घेण्याच्या बहाण्याने दुकानात शिरल्या आणि त्यांनी दुकानातील मुलींना साडी बघण्यात गुंतवून ठेवलं आणि त्यानंतर त्यातील दोन महिलांनी साड्या चोरून त्या आपल्या नेसलेल्या साडीत टाकून तिथून पोबारा केला.
बदलापूर पोलीस ठाण्यात या चोरट्या महिलांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत.
VIDEO:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement