एक्स्प्लोर

ED चौकशीवर संजय राऊत म्हणाले, 'त्या 'वर्षा संजय राऊत', त्या समर्थ आहेत'

PMC Bank Scam Varsha Raut Reaches ED Office शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आज चौकशीसाठी ED कार्यालयात हजर झाल्या आहेत. गेल्या जवळपास चार तासांपासून त्यांची ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरु आहे. या चौकशीसंदर्भात संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आज चौकशीसाठी ED कार्यालयात हजर झाल्या आहेत. गेल्या जवळपास चार तासांपासून त्यांची ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरु आहे. या चौकशीसंदर्भात संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, चौकशी सुरु आहे. पूर्ण होऊ द्या मग बोलू.  कोणत्याही प्रकारे तपास सुरु असताना शक्तिप्रदर्शन करण्याची गरज नाही. हे कोण करतंय हे सगळ्यांना माहिती आहे, असं राऊत म्हणाले. तुम्ही चौकशीसाठी सोबत जाणार का? असं विचारलं असता संजय राऊत म्हणाले की,  त्या वर्षा संजय राऊत आहेत. त्या समर्थ आहेत. मी ऑफिसला बसलो होतो तेव्हा मला कळलं की त्या चौकशीसाठी गेल्या आहेत. काही माहिती जर सरकार मागत असेल तर ती देणं आपलं कर्तव्य आहे. जी माहिती हवी आहे ती आधीही दिली आहे पुढेही देऊ, असं राऊत म्हणाले.

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आज चौकशीसाठी ED कार्यालयात हजर झाल्या आहेत. त्या उद्या 5 जानेवारी रोजी चौकशीसाठी दाखल होणार होत्या. मात्र त्या आजच ईडी कार्यालयात हजर झाल्या. दरम्यान, ईडी कार्यालयाबाहेर शिवसैनिक देखील जमले आहेत. शिवसैनिकांना जमावबंदीची नोटीस देण्यात आली आहे. मात्र आम्ही राऊतांना समर्थन देण्यासाठी आलो आहोत, या नोटिशीला घाबरत नाहीत, असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे. ईडी कार्यालयाबाहेर शिवसैनिकांना रोखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. वर्षा राऊत यांना 11 डिसेंबर रोजी नोटिस बजावण्यात आली होती. त्यावेळी त्या हजर राहिल्या नाहीत. त्यानंतर 29 डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश अंमलबजावणी संचालनालयाने दिले होते. परंतु वर्षा राऊत 28 डिसेंबरला ईडीला पत्र लिहून चौकशीला हजर राहण्यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे आज त्या ईडीच्या कार्यालयात हजर झाल्या आहेत.

दरम्यान, वर्षा राऊत यांना उद्या ऐवजी आज चौकशीसाठी परवानगी दिली याचा अर्थ ईडी सूडबुद्धीने कारवाई करत नाही. आता वर्षा राऊत यांनी 55 लाखांचा काय झालं? कुठून आले ते सांगावं? अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी दिली आहे.

55 लाख रुपयांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीला वर्षा राऊत यांची चौकशी करायची आहे, ज्यात वर्षा राऊत यांनी पीएमसी बँक खात्यामधून आर्थिक व्यवहार झाले होते. ईडीने त्यांना नोटीस पाठवून 29 डिसेंबर रोजी चौकशीसाठी कार्यालयात हजर होण्याने निर्देश दिले होते. पत्नीला ईडीची नोटीस मिळाल्यानंरत संजय राऊत यांनी ट्वीट केलं. होतं. कोणाचंही नाव न घेता त्यांनी लिहिलं होतं की, "आ देखें जरा किसमें कितना है दम, जमकर रखना कदम मेरे साथिया" तसेच 'पुराव्यानिशी आरोप सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जाण्यास तयार राहा. समझनेवाले को इशारा काफी है', असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

शिवसेना आक्रमक; ईडी विरोधात रस्त्यावर उतरणार?

पीएमसी बँक घोटाळा काय आहे? पीएमसी बँकेत बनावट खात्यांद्वारे एका विकासकाला शेकडो कोटी रुपये कर्ज दिल्याची बाब 2019 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आली होती. ही प्रक्रिया पूर्ण होऊ नये यासाठी आरबीआयने सप्टेंबर 2019 मध्ये निर्बंध घातले होते. हे निर्बंध मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आले आहेत. पीएमसी बँक घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना अटक केली होती. पीएमसी बँकला बुडवण्यात जी 44 मुख्य खाती होती, त्यापैकी 10 खाती एचडीआयएलची होती.

'पुराव्यानिशी आरोप सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जा' : संजय राऊत

ईडीच्या कारवाईमुळे शिवसेना आक्रमक गेल्या काही दिवसात शिवसेना नेत्यांवर ईडीने केलेल्या कारवाईमुळे शिवसेना आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळेच ईडी विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरण्याची शक्यता होती. उद्या 5 जानेवारीला महाराष्ट्रातून शिवसैनिक मुंबईत दाखल होणार असल्याचं बोललं जात होतं. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदरमधून बसेस, कारने शिवसैनिक दाखल होणार होते, अशी माहिती मिळाली होती.

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Embed widget