ED Notice to Varsha Raut | वर्षा राऊत यांना ईडी नोटीसनंतर संजय राऊतांचं ट्वीटद्वारे आव्हान, म्हणाले...
वर्षा राऊत यांच्या आधी, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, विहंग सरनाईक आणि भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांनाही ईडीने नोटीस धाडली आहे.
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या 29 डिसेंबरला वर्षा राऊत यांना ईडीसमोर चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता संजय राऊत यांनी केलेलं ट्वीट चर्चेत आहेत. संजय राऊत यांनी ट्वीट करत ईडी आणि केंद्र सरकारला एकप्रकारे आव्हान दिलं आहे.
संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हटलं की, आ देखे जरा किसमे कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथीया. वर्षा राऊत यांना नोटीसीच्या बातम्यांनंतर संजय राऊत यांनी ट्वीट केल्याने त्यांनी एकप्रकारे आव्हानच दिलं आहे. वर्षा राऊत यांच्या आधी, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, विहंग सरनाईक आणि भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांनाही ईडीने नोटीस धाडली आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 27, 2020शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस सूत्रांच्या माहितीनुसार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. वर्षा राऊत यांच्या खात्यात प्रवीण राऊत यांच्या खात्यात काही प्रकारचे व्यवहार झाले. हा व्यवहार कसा झाला आणि त्यामागील कारण काय आहे हे ईडीला जाणून घ्यायचे आहे. वर्षा राऊत यांना संपूर्ण माहिती गोळा करण्यासाठी बोलावण्यात आले आहे.
विरोधी पक्षनेत्यांना धमकावण्यासाठी ईडीचा वापर- नवाब मलिक
ईडीच्या या नोटीसवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक म्हणाले की, केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून ईडीचा खेळ सुरू आहे. विरोधी पक्षनेत्यांना धमकावण्यासाठी ईडीची नोटीस पाठवली जाते. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना नोटिसा पाठवल्या गेल्या. राजकीय द्वेषामुळे भीती निर्माण करण्यासाठी केंद्रीय संस्थांचा वापर केला जात आहे.
ईडीचं हे पाऊल अत्यंत निंदनीय- खासदार अरविंद सावंत
ही ईडी आहे की वेडी आहे. ईडीचं हे पाऊल अत्यंत निंदनीय आहे. एवढे घाणेरडे प्रकार होत असतील तर राजकारण कोणत्या स्थरावर जातंय कळत नाही. वर्षा राऊत आणि पीएमसी बँकेचा का संबंध आहे. सत्तेसाठी इतके घाणेरणे प्रकार सुरु आहेत. असंच सुरुच राहिल्यास ईडीसारख्या संस्थांना टाळे ठोकावे लागतील, असं शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं.
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स, पीएमसी बॅंक घोटाळ्याप्रकरणी ईडी चौकशी करणार