एक्स्प्लोर

पीएमसी बँकेच्या माध्यमातून सोमय्यांनी मनी लॉंड्रिंग केले; संजय राऊतांचा आरोप

Sanjay Raut ED Action : खासदार संजय राऊत यांचे आज मुंबईमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं असून शिवसेनेने एक प्रकारे शक्तीप्रदर्शन केल्याचं स्पष्ट झालं. 

मुंबई : आयएनएस विक्रांतच्या निधीत राष्ट्रभक्तीच्या नावावर कोट्यवधी रुपये गोळा केले आणि पीएमसी बँकेच्या माध्यमातून किरीट सोमय्यानी ते व्हाईट केले असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. देशभरात किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्याविरोधात गुन्हे केले जातील असंही ते म्हणाले. ईडीने केलेल्या कारवाईनंतर संजय राऊत मुंबईमध्ये आले होते. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.  

खासदार संजय राऊत म्हणाले की, "हे आजचे शक्तीप्रदर्शन नाही तर लोकांच्या मनातली चिड आणि संताप आहे. आएनएस विक्रांतचा घोटाळा झाला त्याच्या विरोधात आज शिवसैनिकांनी आंदोलन केलं. आज झालेले हे शक्तीप्रदर्शन नाही तर लोकांच्या भावना आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांबद्दल आज गावपातळीवर चिड आहे. भाजप केंद्रीय तपास यंत्रणांच्या खांद्यावर बंदुक ठेऊन हल्ला करत आहे."

सोमय्यांच्या मुद्द्यावरुन राज्यसभा स्थगित
संजय राऊत म्हणाले की, आयएनएस विक्रांतच्या निधीत राष्ट्रभक्तीच्या नावावर कोट्यवधी रुपये गोळा केले आणि पीएमसी बँकेच्या माध्यमातून किरीट सोमय्यानी ते व्हाईट केले. सोमय्यांच्या घोटाळ्यावर आज राज्यसभेचं कामकाज स्थगित झालं, भाजपचे खासदारसुद्धा यावर बोलू शकले नाही. देशाच्या कानाकोपऱ्यात किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाच्या विरोधात गुन्हे दाखल केले जातील. 

तुम्ही तुमची कबर ही महाराष्ट्रात खोदली आहे, आता ही कबर देशातही खोदली जाईल असं संजय राऊत भाजपला उद्देशून म्हणाले. सोमय्या त्यांच्या आरोपावर उत्तर देत नाहीत याचा अर्थ त्यांनी भ्रष्टाचार केल्याचं स्पष्ट आहे असंही ते म्हणाले. 

शिवसेनेचे मोठे शक्तीप्रदर्शन
बुधवारी ईडीने कारवाई करत संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणली होती. त्यानंतर संजय राऊत आज दिल्लीवरुन मुंबईत आले. संजय राऊत यांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली होती. शिवसेनेने आज शक्तीप्रदर्शन केल्याचं दिसत होतं. 

महत्त्वाच्या बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

इतरांच्या मुलाबाळांना जो न्याय तोच मला; छगन भुजबळांच्या वक्तव्यावर सुनील तटकरेंचा पलटवार, काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष?
इतरांच्या मुलाबाळांना जो न्याय तोच मला; छगन भुजबळांच्या वक्तव्यावर सुनील तटकरेंचा पलटवार, काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष?
अभिनेता जावेद जाफरीच्या पत्नीची 16.24 कोटींची फसवणूक; बीएमसीच्या सहाय्यक आयुक्ताचे निलंबन; नेमकं प्रकरण काय?
अभिनेता जावेद जाफरीच्या पत्नीची 16.24 कोटींची फसवणूक; बीएमसीच्या सहाय्यक आयुक्ताचे निलंबन; नेमकं प्रकरण काय?
Shashikant Shinde On Praful Patel And Sunil Tatkare: पहिले साईडलाईन झाल्याची चर्चा, आता पुन्हा पटेल-तटकरेंचा वरचष्मा; दोघांचं पुन्हा महत्व कसं वाढलं?, शशिकांत शिंदेंनी सांगितलं!
पहिले साईडलाईन झाल्याची चर्चा, आता पुन्हा पटेल-तटकरेंचा वरचष्मा; दोघांचं पुन्हा महत्व कसं वाढलं?, शशिकांत शिंदेंनी सांगितलं!
Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: छगन भुजबळांचा राज्यसभा उमेदवारीचा पत्ता शेवटच्या क्षणी कापला गेला, काँग्रेसचा नेता म्हणाला, 'देवेंद्र फडणवीसच सगळं....'
छगन भुजबळांचा राज्यसभेचा पत्ता शेवटच्या क्षणी कापला गेला, काँग्रेसचा नेता म्हणाला, 'देवेंद्र फडणवीसच सगळं....'

व्हिडीओ

Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके
Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs Afghanistan: भारताने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला, पण तरीही WTC गुणतालिकेत एक गुण सुद्धा का मिळाला नाही?
भारताने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला, पण तरीही WTC गुणतालिकेत एक गुण सुद्धा का मिळाला नाही?
अंबड तहसीलदार लाच प्रकरणात ट्विस्ट, तक्रारदार सुयोग सोळुंकेला अटक; दोन दिवसांची पोलीस कोठडी
अंबड तहसीलदार लाच प्रकरणात ट्विस्ट, तक्रारदार सुयोग सोळुंकेला अटक; दोन दिवसांची पोलीस कोठडी
मेघराज राजे भोसलेंची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर एकहाती सत्ता, समर्थ पॅनलचे सर्व उमेदवार विजयी
मेघराज राजे भोसलेंची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर एकहाती सत्ता, समर्थ पॅनलचे सर्व उमेदवार विजयी
इतरांच्या मुलाबाळांना जो न्याय तोच मला; छगन भुजबळांच्या वक्तव्यावर सुनील तटकरेंचा पलटवार, काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष?
इतरांच्या मुलाबाळांना जो न्याय तोच मला; छगन भुजबळांच्या वक्तव्यावर सुनील तटकरेंचा पलटवार, काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष?
Iran War Live Update: इराण-इस्रायल युद्धाचा पुन्हा भडका, होर्मुझमध्ये जहाजावरील हल्ल्यात 24 भारतीय अडकले, व्हिडिओ शेअर करत नेव्हीकडे मागितली मदत
इराण-इस्रायल युद्धाचा पुन्हा भडका, होर्मुझमध्ये जहाजावरील हल्ल्यात 24 भारतीय अडकले, व्हिडिओ शेअर करत नेव्हीकडे मागितली मदत
काय ही घाण, ह्यांची नावं लिहून घ्या; सुनेत्रा पवारांची सरकारी रुग्णालयात धाड, अजित दादास्टाईल डॉक्टरांना झापलं
काय ही घाण, ह्यांची नावं लिहून घ्या; सुनेत्रा पवारांची सरकारी रुग्णालयात धाड, अजित दादास्टाईल डॉक्टरांना झापलं
India vs Afghanistan: टीम इंडियाकडून अफगाणिस्तानची तिसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रातच शिकार; कसोटी क्रिकेटमधील भारताचा आजवरचा सर्वात मोठा विजय
टीम इंडियाकडून अफगाणिस्तानची तिसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रातच शिकार; कसोटी क्रिकेटमधील भारताचा आजवरचा सर्वात मोठा विजय
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीत 5 मुद्द्यांवर सहमती; ठाकरेंची ऑनलाईन उपस्थिती, ठरली पुढील रणनीती
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीत 5 मुद्द्यांवर सहमती; ठाकरेंची ऑनलाईन उपस्थिती, ठरली पुढील रणनीती
Embed widget