Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Mumbai Crime Dadar Star Mall: स्टार मॉलमध्ये दिवसभर बरीच गर्दी असते. याठिकाणी असलेल्या थाई स्पा सेंटरमध्ये तरुण मुलींना आणले जात होते. वेश्याव्यवसाय सुरु होता.

Mumbai Crime Dadar Star Mall: मुंबईच्या दादर परिसरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या स्टार मॉलमध्ये चक्क वेश्याव्यवसाय (Sex Racket) सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. स्थानिक पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी स्टार मॉलमधील (Star Mall) 'रिबेल स्पा'वर (Rebel spa) धाड टाकली. त्यावेळी या स्पामध्ये पोलिसांना सहा तरुणी आढळून आल्या. या तरुणी 25 ते 30 वयोगटातील आहेत. (Mumbai prostitution racket)
दादरमधील अत्यंत उच्चभ्रू परिसरात स्टार मॉल आहे. शिवाजी पार्क आणि शिवाजी मंदिर नाट्यगृहापासून स्टार मॉल अगदी काही अंतरावरच आहे. त्यामुळे स्टार मॉल आणि आजुबाजूचा परिसर अत्यंत गजबजलेला असतो. अशा वर्दळीच्या ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरु असेल, याचा अंदाज कोणालाही आला नाही. याचाच फायदा घेत स्टार मॉलमध्ये असणाऱ्या 'रिबेल थाई स्पा' याठिकाणी वेश्याव्यवसायाचे हे रॅकेट चालवले जात होते.
याठिकाणी स्पा असल्याचे दाखवून याठिकाणी पद्धतशीरपणे देहविक्रय करणाऱ्या तरुणी, महिला दलाल, स्पा मॅनेजर असे नेटवर्क तयार करण्यात आले होते. शिवाजी पार्क पोलिसांनी 'रिबेल थाई स्पा'वर धाड टाकली तेव्हा याठिकाणी 25 ते 30 वयोगटातील सहा तरुणी आढळून आल्या. या सर्व मुलींची सुटका करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी आशा परमार, 'रिबेल थाई स्पा'चा व्यवस्थापक साहिल पिल्लई यांना अटक केली आहे. दादरसारख्या परिसरात वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे समोर आल्यानंतर या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा रहिवासी भाग असून देहविक्रयाचा हा प्रकार नक्की कधीपासून सुरु होता, याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. त्यासाठी अटक करण्यात आलेल्या महिला आणि पुरुषांची चौकशी केली जात आहे. परंतु, दादरसारख्या परिसरात इतके दिवस हा प्रकार सुरु असताना पोलिसांना किंवा इतर कोणालाही याचा सुगावा कसा लागला नाही, याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता पोलिसांच्या तपासातून या सगळ्याविषयी आणखी कोणती नवीन माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आणखी वाचा





















