Shivsena Protest : किरीट सोमय्यांच्या विरोधात शिवसेनेचं ठिकठिकाणी आंदोलन, तातडीनं अटक करण्याची मागणी
Shivsena Protest : किरीट सोमय्यांना अटक करावी यासाठी शिवसेनेचे विभागवार आंदोलनं सुरु आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर किरीट सौमय्यांच्या विरोधात शिवसेनेचे ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे
Shivsena Protest : आयएनएस विक्रांत जहाज वाचवण्यासाठी जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयात पोहचलेच नसल्याचे समोर आले आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीतून ही बाब समोर आली असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले. हा देशद्रोहीपणा असून त्याचा तपास केंद्रीय संस्थांनी करावा असे आव्हानही राऊत यांनी दिलं आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणी किरीट सोमय्यांना अटक करावी यासाठी शिवसेनेचे विभागवार आंदोलनं सुरु आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर किरीट सौमय्यांच्या विरोधात शिवसेनेचे ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे, किरीट सोमय्यांवर गुन्हा तर दाखल झाला आहे, पण तातडीनं अटक करावी अशी मागणी आता शिवसैनिक करू लागले आहेत.
कोल्हापूर : किरीट सोमय्या विरोधात शिवसेनेकडून आंदोलन करण्यात येत आहे. शिवसेनेचे शेकडो नेते आंदोलनात सहभागी होत आहेत. परभणीत शिवसेनेचे सोमय्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शन केले
परभणी : आयएनएस विक्रांत बाबत संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात केलेल्या आरोपानंतर परभणीत शिवसेनेने सोमय्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शन करण्यात आली आहे..शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेनीक जमा झाले होते.तिथून सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर चालत जात किरीट सोमय्या आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सोमय्या हे देशद्रोही असुन त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केलीय..
उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये शिवसेनेने कल्याण बदलापूर महामार्ग रोखून धरत किरीट सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन केलं. या रस्ता रोकोमुळे काही काळ महामार्गवर वाहतूक कोंडी झाली होती. मात्र पोलिसांनी आंदोलनकर्त्याना ताब्यात घेत महामार्ग मोकळा केला. आय. एन. एस विक्रांत वाचवण्यासाठी सोमय्या यांनी जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयापर्यंत पोहोचलेच नाहीत, हे माहितीच्या अधिकारात उघड झाले असून त्यात १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळे आता किरीट सोमय्या यांच्या विरोधात महाराष्ट्र भर शिवसेना आंदोलन करत आहे. किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणीकरत सोमय्या यांच्या निषेधाच्या घोषणा यावेळी शिवसैनिकांकडून देण्यात आल्या.
रायगड : किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची शिवसैनिकांची मागणी करण्यात आली आहे, रायगडात शिवसेनेचे सोमय्या विरोधात आंदोलन करण्यात आले, देशद्रोही किरीट सोमय्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. आयएनएस विक्रांत युद्धनोकेचे जतन करण्यासाठी गोळा करण्यात आलेले पैसे किरीट सोमय्या यांनी वापरल्याचा आरोप संजय राऊतांनी केली
अहमदनगर : किरीट सोमय्या यांच्या विरोधात शिवसेनेची निदर्शनं करण्यात येत असून अहमदनगर येथे शिवसेनेच्या वतीने भाजप नेते किरीट सोमय्या यांचा निषेध करण्यात आला शिवसेनेच्या वतीने माळीवाडा बस स्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आयएनएस विक्रांत जो देशाचा एक ठेवा आहे, त्याच्या नावावर महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करून पैसे जमा केले. हा एक प्रकारे राष्ट्रद्रोहच आहे असं आंदोलकांनी यावेळी म्हटलं आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी शिवसेनेकडून करण्यात आली. सोबतच भाजपने सोमय्या यांची पक्षातून हकालपट्टी करावी असं मत शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम यांनी मांडले.
बीड : आयएनएस विक्रांत साठी गोळा केलेला निधी किरीट सोमय्यांनी हडप केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केल्यानंतर सोमय्या त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे..बीडमध्ये शिवसेनेच्या वतीने किरीट सोमय्या यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची गाढवावरुन धिंड काढून आंदोलन करण्यात आलं