एक्स्प्लोर
झोपलो नव्हतो, मान खाली घालून चिंतन करत होतो : संदीप बाजोरिया

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेचं भाषण सुरु असताना, मी झोपलो नव्हतो. मी मान खाली घालून चिंतन करत होतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप बजोरिया यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. कोपर्डीच्या निर्भयावर झालेल्या अत्याचारावर विधानपरिषदेत वादळी चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी आमदार संदीप बाजोरिया यांना मात्र डुलक्या अनावर झाल्या होत्या. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे पुढच्या बाकावर अतिशय आक्रमकपणे आणि मुद्देसूद भाषण करत असताना बाजोरियांना झोप लागल्यानं संताप व्यक्त होतो आहे.
संबंधित बातमी : कोपर्डी प्रकरणावर चर्चा, राष्ट्रवादीचे आमदार बाजोरियांना डुलक्या!
अखेर ही बाब इतर सदस्यांच्या लक्षात आल्यानंतर शिपायाकडून बाजोरिया यांना चिठ्ठी पोहोचवण्यात आली, आणि त्यानंतर बाजोरिया सभागृहातून उठून गेले. थोड्या वेळानंतर बजोरिया पुन्हा एकदा सदनात परतले. पाहा व्हिडीओ-आणखी वाचा























