Jitendra Awhad: राज ठाकरेंच्या डेअरिंगला सलाम, त्यांना मानाचा मुजरा; कुंभमेळ्याबाबतच्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांकडून कौतूक
Jitendra Awhad on Raj Thackeray: आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंच्या डेअरींगला सलाम आहे, त्यांनी जे वक्तव्य केलं त्याबद्दल त्यांना मानाचा मुजरा असं म्हणत ठाकरेंचं समर्थन केलं आहे.

मंबई: कुंभमेळा संपला मात्र, महाराष्ट्रात मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. कुंभमेळ्यामधून आणलेल्या गंगाजलावर बोलताना राज ठाकरेंनी गंगेतील प्रदूषणावर बोट ठेवलं. गंगेतल्या प्रदूषणाबद्दल राज ठाकरेंनी हल्लाबोल केला. प्रदूषणामुळे अरे हाड.. असं म्हणत त्यांनी बाळा नांदगावकरांनी आणलेलं गंगाजल प्राशन करण्यासही नकार दिला. राज कपूर आणि राम तेरी गंगा मैली सिनेमाच उदाहरण देत राज ठाकरेंनी लोकांना श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातून बाहेर येण्याचाही आवाहन केलं आहे. राज कपूरानी चित्रपट पण काढला. लोकांना वाटली झाली गंगा साफ… त्याच्यात वेगळीच गंगा… लोकं म्हणाले अशीच गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत. आजून पण गंगा काही साफ व्हायला तयार नाही. या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतून बाहेर या जरा सगळ्यातनं डोके हलवा नीट, असं राज ठाकरे म्हणाले त्यानंतर आता अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत, अशातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंच्या डेअरींगला सलाम आहे, त्यांनी जे वक्तव्य केलं त्याबद्दल त्यांना मानाचा मुजरा असं म्हणत ठाकरेंचं समर्थन केलं आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
राज ठाकरेंनी जे वक्तव्य केलं ते वक्तव्य आम्ही केलं असतं, तर आमच्या घरावरती मोर्चा आले असते. आम्हाला देशद्रोही ठरवलं असतं. मात्र, राज ठाकरे यांनी बोलायचं धाडस दाखवलं याचं मी कौतुक करतो. ही राज ठाकरेंची भूमिका नाही तर देशातल्या अनेक नागरिकांना देखील असंच वाटतं. फक्त ते बोलू शकत नाहीत. हेच आम्ही केले असतं तर मोर्चे निघाले असते, देशद्रोही झालो असतो.
मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे, हिंमतीनं बोलणारा माणूस आहे, त्यांचे अभिनंदन. आम्ही षंड गांडू झालो आहोत. राज ठाकरेंच्या डेअरींगला त्यांच्या सलाम आहे. त्यांनी जे वक्तव्य केलं, त्याबद्दल त्यांना मानाचा मुजरा करतो. राज ठाकरेंच्या डेअरींगला सलाम आहे, असं म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना समर्थन दिलं आहे.
नेमके काय म्हणाले राज ठाकरे?
चिंचवडमधील मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, मुंबईत आमच्या पदाधिकाऱ्यांची मेळावा बैठक लावली होती. त्यात काही शाखेचे पदाधिकारी गैरहजर होते आणि जे गैरहजर होते त्यांची हजेरी मी घेतली. त्यावेळी प्रत्येकाला विचारले असता त्यातल्या अनेकांनी आपली आपली कारणे दिली. त्यातल्या बहुतांश लोकांनी कुंभमेळ्याचे कारण पुढे केले. त्यामुळे मुळात तुम्ही पाप करताच कशाला? असा प्रश्न मी त्यांना केला. शिवाय परत आल्यावर अंघोळ केली का असेही विचारले. बाळा नांदगावकर ही कमंडलुमधून पाणी घेऊन आले. मी त्यांना म्हटले, हड मी ते पिणार नाहीये. सोशल मीडियावर माणसं-बाया अंग घासून अंघोळ करत आहेत आणि आमचे बाळा नांदगावकर पाणी प्यायला देत आहेत. मला सांगा कोण पिणार ते पाणी, नुकताच कोरोना महामारी होऊन गेली आहे. दोन वर्ष तोंडाला कापड लावून आपण फिरलो आणि तिकडे जाऊन कुंभमेळ्यात अंघोळ करत आहेत. श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही? एक नदी या देशातील स्वच्छ नाही. परदेशात ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस तिथल्या नद्या पाहतो, तर त्या एकदम स्वच्छ असतात. आपण आपल्या इथे नद्यांना माता म्हणतो मात्र परदेशात असे होत नाही. तरीही त्या नद्या स्वच्छ आहेत. मात्र आपल्या इथल्या नद्यांमध्ये सर्व प्रदूषित पाणी सोडले जाते. नदी अस्वछता हा कळीचा मुद्दा आहे. आता तुम्ही श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजा, असं राज ठाकरे म्हणाले.























