एक्स्प्लोर

Sachin Vaze Case: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगतो हे खोटं आहे : अनिल परब

भाजपचे पदाधिकारी आम्ही तिसरा बळी घेऊ म्हणत होते. 'त्यामुळे भाजपने हे बनवलेलं प्रकरण आहे' 'वाझे हे पत्र देणार आहे, हे भाजपला आधीपासून माहीत होतं म्हणून ते गाजावाजा करत आहे' असा पलटवार मंत्री अनिल परब यांनी केला आहे.

मुंबई : अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकं आणि मनसुख हिरण हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझे यांनी एनआयएच्या कोर्टात लेटर बॉम्ब फोडला आहे. हस्तलिखित पत्रातून वाझे यांनी कोर्टापुढे जबाब नोंदवला आहे. त्यात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि शिवसेना मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावर अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 
 
आज सचिन वाझे लिहिलेल्या पत्रात माझ्या नावाचा उल्लेख केला आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेत शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी वाझे यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. जून, ऑगस्ट 2020 ला वाझे यांनी SBUT ट्रस्टीकडून 50 कोटी घेण्याचा आरोप केला आहे. जानेवारी 2021 ला मी मुंबई महापालिका कंत्राटदाराकडून 2 कोटी रुपये जमा करण्याच्या सूचना दिल्या. 'या दोन्ही गोष्टी खोट्या आहेत, माझ्यावर खंडणीचे कोणतेही संस्कार नाही.', असे म्हणत  'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि माझ्या दोन्ही मुलींची शपथ घेऊन मी सांगतो की हे खोटं आहे.' 'मला बदनाम करण्यासाठी केलेले आरोप आहेत', अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली आहे.

भाजपचं षडयंत्र : अनिल परब

भाजपचे पदाधिकारी आम्ही तिसरा बळी घेऊ म्हणत होते. 'त्यामुळे भाजपने हे बनवलेलं प्रकरण आहे' 'वाझे हे पत्र देणार आहे, हे भाजपला आधीपासून माहीत होतं म्हणून ते गाजावाजा करत आहे' आजच्या पत्रात माझ्यावर, देशमुख आणि अजित पवार यांच्या जवळचे घोडावत यांच्यावर आरोप केले आहेत. माझ्यावर केलेले हे आरोप खोटे आहेत. मी आज कुठल्याही चौकशीला सामोरा जायला तयार आहे. मला चौकशीला बोलवावं मी जायला तयार आहे. CBI चौकशीचा निर्णय आला आणि आज हे पत्र आलं. परामबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांना पत्र लिहिलं त्यात हा उल्लेख नाही. आतापर्यंतच्या पत्रात कुठेही असा उल्लेख नाही. मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांना बदनांकरण्याचा हा डाव आहे. NIA ची चौकशी स्फोटकांची आहे, पण त्याचा शोध अजून लावला नाही. माझी नार्को टेस्ट केली तरी मी सामोरा जायला तयार आहे.

माझे पक्षप्रमुख फासावर लटकवतील : अनिल परब

'NIA, CBI, रॉ कुठलीही चौकशी लावली तरी मी तयार आहे. सरकारची बदनामी करण्यासाठी हे पत्र आहेत. सचिन वाझे कस्टडीत आहे, त्याने अजून कोणाकडे तक्रार केली नाही. अशी पत्रं बाहेर काढून सरकारला बदनाम केलं जात आहे. वाझे काही काळ शिवसेनेत होते, प्रदीप शर्मा पण शिवसेनेचे उमेदवार होते मान्य करतो. पण वाझेंना शिवसेनेने असं काम करायला सांगितलं नाही. केंद्रीय यंत्रणांचा वापर कसून शिवसेनेच्या मागे ससेमिरा लावला आहे. बदनामीचा हा लेटर बॉम्ब काढून आम्हाला काही होणार नाही. मला चौकशीला बोलवा मी दोषी असेल तर मला माझे पक्षप्रमुख फासावर लटकवतील. मी पूर्णपणे कायदेशीर लढणार, मी लढाईच्या तयारीत आहे. अश्या धमक्यांना मी घाबरत नाही. मला टार्गेट करून मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप अनिल परब यांनी केला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Praful Patel : सीबीआयकडून प्रफुल्ल पटेलांविरोधातील नोंदवलेला भ्रष्टाचाराचा खटला बंद, अधिकाऱ्यांना क्लीन चिट
सीबीआयकडून प्रफुल्ल पटेलांविरोधातील नोंदवलेला भ्रष्टाचाराचा खटला बंद, अधिकाऱ्यांना क्लीन चिट
CM Eknath Shinde Speech : अभिनेता Govinda शिवसेनेत, प्रवेश करताच मुख्यमंत्र्यांकडून मोठी जबाबदारी
अभिनेता गोविंदा शिवसेनेत, मुख्यमंत्री शिंदेंकडून मोठी जबाबदारी
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2024 | गुरूवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2024 | गुरूवार
Sanjay Gaikwad files Nomination : प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड लोकसभेच्या मैदानात
प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड बुलढाणा लोकसभेच्या मैदानात
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  06 PM : 28 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सCM Eknath Shinde Speech : अभिनेता Govinda शिवसेनेत, प्रवेश करताच मुख्यमंत्र्यांकडून मोठी जबाबदारीRashmi Barve : अनुसूचित जातीच्या महिलेवर झालेला हा अन्याय आहे - रश्मी बर्वेAshok Chavan on Prakash Ambedkar  : मविआने प्रकाश आंबेडकरांना योग्य सन्मान दिला नाही - अशोक चव्हाण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praful Patel : सीबीआयकडून प्रफुल्ल पटेलांविरोधातील नोंदवलेला भ्रष्टाचाराचा खटला बंद, अधिकाऱ्यांना क्लीन चिट
सीबीआयकडून प्रफुल्ल पटेलांविरोधातील नोंदवलेला भ्रष्टाचाराचा खटला बंद, अधिकाऱ्यांना क्लीन चिट
CM Eknath Shinde Speech : अभिनेता Govinda शिवसेनेत, प्रवेश करताच मुख्यमंत्र्यांकडून मोठी जबाबदारी
अभिनेता गोविंदा शिवसेनेत, मुख्यमंत्री शिंदेंकडून मोठी जबाबदारी
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2024 | गुरूवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2024 | गुरूवार
Sanjay Gaikwad files Nomination : प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड लोकसभेच्या मैदानात
प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड बुलढाणा लोकसभेच्या मैदानात
Aishwarya Abhishek on Aradhya Bachchan : बच्चन कुटुंबापासून दूर होणार आराध्या; ऐश्वर्या-अभिषेकने घेतला महत्त्वाचा निर्णय
बच्चन कुटुंबापासून दूर होणार आराध्या; ऐश्वर्या-अभिषेकने घेतला महत्त्वाचा निर्णय
Sangli Loksabha : सांगली, हातकणंगलेत कोण कोणाचा 'करेक्ट कार्यक्रम' करतंय? गल्ली ते दिल्ली एकच चर्चा रंगली!
सांगली, हातकणंगलेत कोण कोणाचा 'करेक्ट कार्यक्रम' करतंय? गल्ली ते दिल्ली एकच चर्चा रंगली!
Shiv Sena : निगेटिव्ह सर्व्हेच्या नावावर शिंदेंच्या जागा भाजपकडून बळकण्याचं सत्र, मग विधानसभेचं काय? शिवसेनेचे आमदार नाराज
निगेटिव्ह सर्व्हेच्या नावावर शिंदेंच्या जागा भाजपकडून बळकण्याचं सत्र, मग विधानसभेचं काय? शिवसेनेचे आमदार नाराज
Mumbai Indians: मुंबई इंडियन्समध्ये फुट पडल्याची चर्चा; हार्दिकच्या गटात इशान किशन, रोहितच्या गटात कोण?
मुंबई इंडियन्समध्ये फुट पडल्याची चर्चा; हार्दिकच्या गटात इशान किशन, रोहितच्या गटात कोण?
Embed widget