एक्स्प्लोर

‘उपलोकायुक्त 'वर्षा'वर नेमा’, ‘सामना’मधून फडणवीसांवर टीकेचे बाण

मुंबई: मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार रोखण्यासाठी स्वतंत्र उपलोकायुक्त नेमणुकीची घोषणा केल्यानंतर ‘सामना’तून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधण्यात आला आहे. ‘शिवसेनाच मुंबईची खरी पहारेकरी आहे. त्यामुळं उपलोकायुक्त नेमायचाच तर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर नेमा.’ अशा शब्दात सामनातून टीका करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठकांपासून पारदर्शकतेची घडी बसवायला सुरुवात करुन आदर्श पायंडा घालावा, असा सल्लाही शिवसेनेच्या मुखपत्रातून देण्यात आला आहे. ‘सर्वात जास्त घोटाळे नागपूर महापालिकेत झाले आहेत. मग तिथे उपलोकायुक्तांचे लंचाड का नाही?’ असा सवालही सामनातून उपस्थित करण्यात आला आहे. एक नजर ‘सामना’च्या अग्रलेखावर: ‘वर्षा’ बंगल्यावरही उपलोकायुक्त नेमा!! - मुंबईची खरी आणि सचोटीची पहारेकरी एकमेव शिवसेनाच आहे व हे सर्वमान्य, सर्वपक्षीय सत्य आहे. या सचोटीवर तुम्ही काय म्हणून पहारेकरी बसवणार? पुन्हा मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार वगैरे रोखण्यासाठी एका खास उपलोकायुक्तांची नेमणूक केल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. खरं तर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावरच एका स्वतंत्र उपलोकायुक्तांची नेमणूक करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठकांपासून पारदर्शकतेची घडी बसवायला सुरुवात करावी व एक आदर्श पायंडा घालून द्यावा. मुंबईचे काय करायचे ते आम्ही पाहू. अशा अनेक थैलीबाज लचांडांना आम्ही पुरून उरलो आहोत. त्यामुळे कोणत्याही टांगत्या तलवारीची भीती आम्हाला नाही. - आम्ही शब्द दिल्याप्रमाणे मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेचाच शिलेदार विराजमान होत आहे. संपूर्ण देशाचे लक्ष यानिमित्ताने मुंबईतील घडामोडींकडे लागले होते, पण सत्ता आणि पैशाने ‘घडा’ भरूनही शिवसेनेवर विजय मिळवणे अवघडच झाले होते. अर्थात अशा अवघड व कठीण परिस्थितीतच शिवसेना तेजाने उजळून निघते. संकटांवर मात करून विजयाचा भगवा झेंडा फडकवते हा इतिहास आहेच. मुंबई महापालिका निवडणुकांचे निकाल जे लागायचे ते लागले आहेत. त्या निकालांची पुरेपूर आणि भरपूर विश्लेषणेही झाली आहेत. सलग पाच निवडणुकांत मुंबईकरांनी पहिली पसंती शिवसेनेला देऊन जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला नाकारण्याचा कर्मदरिद्रीपणा महाराष्ट्राने कधीच मान्य केला नसता; पण मुंबईचे महापौरपद काही झाले तरी शिवसेनेला मिळू द्यायचे नाही व यानिमित्ताने मराठी अस्मितेला महाराष्ट्राच्या राजधानीतच ‘दफन’ करायचे असे ‘निजामी’ विडे उचलण्यात आले. - अर्थात शेवटी निजामास या देशातून पळ काढावा लागला होता हादेखील इतिहास आहे. भारतीय जनता पक्षाने ऐनवेळी महापौरपदाच्या निवडणुकीत माघार घेतली. महापौर, उपमहापौरपदासह कोणत्याही पदांसाठी भारतीय जनता पक्ष निवडणुका लढविणार नसल्याची घोषणा स्वतः मुख्यमंत्र्यांनीच केली. त्यांनी निवडणुकीत माघार घेतली ही त्यांची भूमिका. ती का घेतली हा त्यांचा प्रश्न. पण ही निवडणूक कोणत्याही क्षणी झाली असती तरी महापौर शिवसेनेचाच झाला असता याची खात्री सत्ताधारी पक्षालाही होती व साहजिकच इतका ‘रस’ पिळूनही हाती बियाही लागल्या नाहीत अशी नामुष्की त्यांच्यावर ओढवली असती.  - शिवसेनेला तर ही निवडणूक लढूनच जिंकायची होती. तो विजय म्हणजे शिवाजीराजांनी मारलेल्या अनेक लढायांप्रमाणे दिग्विजयच ठरला असता. अर्थात अशा लढाया मारण्याची संधी व प्रसंग यापुढे अनेकदा येणार आहेत. लढायांना शिवसेना घाबरत नाही. मुख्यमंत्री म्हणतात, पारदर्शकतेच्या नावावर आम्हाला जनतेने मतदान केले आहे! मुख्यमंत्र्यांचे हे विधान मुंबईकरांवर अविश्वास दाखवणारे आहे. पारदर्शकतेचा नगारा हे एक राजकीय ढोंग आहे. मुंबईची ओळख ‘मराठी’ जनता हीच आहे; पण मुंबईत इतर प्रांतीयही मोठय़ा संख्येने राहत आहेत. एरवी अहिंसेवर प्रवचने झोडणारे जैन मुनी व त्यांचा समाज काही लाखाने मुंबईत राहतो. या जैन मुनींनी भारतीय जनता पक्षाचे ‘भाडोत्री’ एजंट असल्यासारखा प्रचार मुंबईत केला. - मुंबईतील कत्तलखाने व मांसाहार बंद करायचा असेल तर भारतीय जनता पक्षाला मतदान करा, असे फतवे काढून एकगठ्ठा जातीय मतदान भाजपकडे वळवले. यास तुम्ही पारदर्शकतेला झालेले मतदान म्हणत असाल तर ते ढोंग आहे. महाराष्ट्राची फसवणूक आहे. तद्दन जातीय, प्रांतीय आणि मराठीद्वेषांतून झालेल्या मतदानास ‘विजय’ म्हणवून घेणार असाल तर ती ‘थाप’च आहे. मुख्यमंत्री असेही म्हणतात, मुंबईची सत्ता मिळविण्यासाठी कोणाशीही कसलीही तडजोड करून भाजप महापौरपद मिळवणार नाही. आमचे निवडून आलेले ८२ नगरसेवक पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून काम करतील. हीसुद्धा एक थापच आहे. शिवसेना पराभवाचे सर्व प्रयत्न सपशेल फसले होते म्हणूनच ही माघारीची उपरती झाली का? बरे, मुख्यमंत्री व त्यांचे सरकार ‘कोणत्याही’ तडजोडी करतच नव्हते तर मग तुरुंगातील पिताश्रींशी संवाद साधून नगरसेविका कन्येस भाजपच्या गोटात खेचण्याचे जे ‘पारदर्शक’ प्रयोग झाले त्यास मुंबई महापालिकेचा कारभार ‘माफियामुक्त’ करण्याचे नवे डावपेच समजायचे काय? - मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार वगैरे रोखण्यासाठी एका खास उपलोकायुक्तांची नेमणूक केल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. हा पराभवानंतरचा रडीचा डाव व सत्तेचा दुरुपयोग आहे. अर्थात हे जे काही उपलोकायुक्तांचे लचांड आहे त्यास आम्ही डरत नाही; पण तुमच्याच सरकारी ‘आयुक्ता’वरचा हा अविश्वास आहे. बरं, हा जो काही भ्रष्टाचार वगैरे तुम्ही आहे म्हणताय तो काय फक्त मुंबईतच आहे काय? सगळय़ात जास्त घोटाळे हे नागपूर महानगरपालिकेत आहेत. मग तेथे तुमचे ते उपलोकायुक्तांचे लचांड का नाही? पुणे-पिंपरी, चिंचवड वगैरे महानगरपालिकांत पारदर्शकता आणण्यासाठी उपलोकायुक्तांना का नेमले नाही, यामागचे गौडबंगाल लोकांना समजते. राज्यातील सर्वच नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यांच्यावरही मग उपलोकायुक्त नेमायला हवेत. खरं तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरच एका स्वतंत्र उपलोकायुक्ताची नेमणूक करणे गरजेचे आहे. संबंधित बातम्या: उद्धव ठाकरेंचा सरकारला पूर्ण पाठिंबा, मुख्यमंत्र्यांचा दावा राजीनामे सध्या खिशातून काढून ठेवले आहेत : रामदास कदम Maha Budget 2017: अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून भाजपने माघार घेतली, तरी मी स्थायी समितीत बसणार : गीता गवळी भाजपच्या बिनशर्त माघारीमुळे गीता गवळींची पंचाईत? मुंबई महापौर निवडणूक : पडद्यामागे नेमकं काय घडलं? भाजपचे ‘पहारेकरी’ असले, तरी आमची सिक्युरिटी टाईट असेल : अनिल परब
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Wankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024Sachin Tendulkar Interview at Wankhede Stadium : वानखेडेचा सुवर्णमहोत्सव, सचिन तेंडुलकर EXCLUSIVEJOB Majha : डीकेटेड  फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि.मध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget