'...पण पंडितांनी केलेली वर्गवारी चुकीची होती'; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचं वक्तव्य
Maharashtra: मुंबईतील रोहिदास जयंतीच्या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, संत रोहिदास आणि बाबासाहेबांनी समाजात एकोपा प्रस्थापित करण्याचं काम केलंय.
Mohan Bhagwat: जात देवानं नाही तर पंडितांनी निर्माण केली. देवानं नेहमीच सांगितलंय की, माझ्यासाठी सर्व एक आहेत. त्यात कोणतीही जात-वर्ण नाही. पण पंडितांनी वर्गवारी केली, जी चुकीची आहे, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat) यांनी केलं आहे. तसेच, या वर्गवारीचा फायदा इतरांनी घेतला आणि त्यामुळेच देशावर हल्ला झाला, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) प्रमुख मोहन भागवत यांनी केले आहे. याच कारणास्तव बाहेरून आलेल्या लोकांनी आपल्या देशावर राज्य केलं. मोहन भागवत संत शिरोमणी रोहिदास जयंतीनिमित्त (Sant Rohidas Maharaj Jayanti) एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. याच कार्यक्रमात ते बोलत होते.
मुंबईतील कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, संत रोहिदास यांच्यावर बोलण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. संत रोहिदास आणि बाबासाहेबांनी समाजात एकोपा प्रस्थापित करण्याचं काम केलं. देशाच्या आणि समाजाच्या विकासाचा मार्ग जर कोणी दाखवला असेल, तर तो संत रोहिदास यांनी. कारण त्यांनी समाजाला बळकट आणि पुढे नेण्यासाठी आवश्यक असलेली परंपरा दिली आहे.
सरसंघचालक मोहन भागवत काय म्हणाले?
सरसंघचालक मोहन भागवत बोलताना म्हणाले की, "देशातील जनतेनं सुरुवातीला स्वत:च्या मनाला कोंडीत टाकलंय. याला कोणीही जबाबदार नाही, समाजातील आपुलकी संपली, तरच स्वार्थ मोठा होतो. आपल्या समाजाच्या फाळणीचा फायदा इतरांनी घेतला, नाहीतर आमच्याकडे पाहण्याची कोणाची हिंमत नव्हती. याचा फायदा बाहेरून आलेल्या लोकांनी घेतलाय."
पाहा व्हिडीओ : Mohan Bhagwat Full Speech : मानवता धर्म मानणारा धर्म म्हणजे हिंदू धर्म : मोहन भागवत
देवानंही हेच सांगितलंय : सरसंघचालक मोहन भागवत
ते पुढे म्हणाले की, देशात हिंदू समाज उद्ध्वस्त होण्याची भीती दिसतेय का? ही गोष्ट तुम्हाला कोणताही ब्राह्मण सांगू शकत नाही. तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आपली उपजीविका म्हणजे, समाजाप्रती जबाबदारी. प्रत्येक काम समाजासाठी असताना काही उच्च, काही शुद्र, किंवा काहीजण वेगळे कसे झाले? देव नेहमी म्हणतो की, माझ्यासाठी सर्व एक आहेत. त्यांच्यात जात, वर्ण नाही, पण पंडितांनी एक वर्गवारी केलीये, ते चुकीचं होतं.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख म्हणाले की, "देशात विवेक आणि चैतन्य हे सर्व एक आहेत. त्यांच्यात कोणताही फरक नाही. फक्त मत वेगळं आहे. आम्ही धर्म बदलण्याचा प्रयत्न केला नाही." बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की, "धर्म बदलला तर परिस्थिती कशी बदलायची हे सांगितलं आहे."