एक्स्प्लोर

ट्रेन आंदोलकांवर रेल्वेसोबत ऑफिसमध्ये बॉसही कारवाई करणार!

मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यास प्रवासी अनेकदा आंदोलनाचं हत्यार उपसतात. मात्र आता ही आंदोलनं करणं नोकरदारांना चांगलंच महागात पडू शकतं. मध्य रेल्वेकडून संबंधित प्रवाशांच्या बॉसला कारवाई करण्यास सांगितलं जाणार आहे. 'मुंबई मिरर'ने यासंदर्भात बातमी दिली आहे. गेल्या काही काळामध्ये रेलरोकोच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. याला चाप लावण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहे. आंदोलक प्रवाशांविरोधात रेल्वे अॅक्टच्या कलम 153 अन्वये अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार आहेच, मात्र संबंधित नोकरदारांच्या मालकांनाही त्यांच्यावर स्वतंत्र कारवाई करण्यास रेल्वे सुचवणार आहे. यापूर्वी रेल्वेरोको करणाऱ्यांना काही काळ ताब्यात घेतलं जायचं. त्यानंतर फक्त दोन हजारांचा दंड आकारुन त्यांची सुटका केली जायची. आंदोलक प्रवाशांचे सिझन पास रद्द करता येतील का, यावर मध्य रेल्वेने आर्थिक विभागाकडे मत मागवलं आहे. 2016 मध्ये प्रवाशांनी केलेल्या रेलरोकोच्या आठ घटना समोर आल्या होत्या. 2014 आणि 2015 मध्ये मात्र अशाप्रकारे प्रत्येकी एकच आंदोलन झालं होतं. नवीन वर्षाची सुरुवातही मध्य रेल्वेसाठी फार बरी झाली नाही, गेल्या आठवड्यातही दिवा स्थानकावर वाहतूक रेंगाळल्याने प्रवाशांचा संताप झाला होता. प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या या निर्णयाचं स्वागतच केलं आहे. ही कठोर कारवाई करण्यात यावी, मात्र मध्य रेल्वेवरील दिरंगाई टाळली गेलीच पाहिजे, असं मत काही प्रवाशांनी व्यक्त केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई

मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश

मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर

Embed widget