एक्स्प्लोर
सायनमध्ये उड्डाणपुलाची दुरुस्ती, 1 डिसेंबरपासून वाहतुकीच्या कोंडीची शक्यता
मुंबईकरांना येत्या 1 डिसेंबरपासून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
मुंबई : मुंबईकरांना येत्या 1 डिसेंबरपासून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कारण मुंबईतील रहदारीचा सायन जंक्शनवरील उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामासाठी पुढील तीन महिने बंद राहणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पुलाच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे सायनहून दादर, परळच्या दिशेने जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहतुकीचा यामुळे खोळंबा होणार आहे.
सायनचा हा उड्डाणपूल 25 वर्षांपेक्षा जुना आहे. गेल्या काही दिवसात झालेल्या पुलांच्या दुर्घटनांमुळे सायन जंक्शनवरील या उड्डाणपुलाची दुरुस्ती केली जाणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement