(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dhananjay Munde | धनंजय मुंडे यांना दिलासा, तूर्तास राजीनामा घेणार नाही
बलात्काराचा आरोपांमुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत चालला होता. पंरतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत धनंजय मुंडे यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तूर्तास त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असा निर्णय पक्षाच्या बैठकीत झाला.
मुंबई : बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना पक्षाकडून दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बलात्काराचा आरोपांमुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत चालला होता. विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्या मागणी केली होती. परंतु मुंडे यांना पक्षाकडून तूर्तात तरी दिलासा मिळाला आहे.
रेणू शर्मा नावाच्या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले. परंतु ही महिलाच ब्लॅकमेलिंग करत असल्याची बाब समोर आली. पक्षप्रमुख शरद पवार यांनी याबाबत माहिती घेतली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यामुळे तूर्तास तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत निश्चित झाल्याचं कळतं.
धनंजय मुंडे यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक झाली. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील हे बैठकीला उपस्थित होते.
धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. संबंधित तरुणीने मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत यावर स्पष्टीकरण दिलं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. धनंजय मुंडे यांनी स्वत: रेणू यांची बहीण करुणा यांच्याबरोबरच्या संबंधातून त्यांना दोन मुले झाल्याचा खुलासा केला आहे.
Sharad Pawar | धनंजय मुंडेंवरील आरोपांचं स्वरुप गंभीर, पक्ष म्हणून निर्णय घ्यावा लागेल : शरद पवार
मनसे, भाजपच्या नेत्यासह जेट एअरवेजच्या अधिकाऱ्याचा रेणू शर्मावर आरोप धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कारचा आरोप करणाऱ्या रेणू शर्माबाबत भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यानंतर या महिलेने ब्लॅकमेल केल्याचा दावा आणखी दोघांनी केला आहे. भाजप नेते माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी सदर महिलेने हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याचा प्रयत्न केल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे केली आहे. मनसे नेते मनीष धुरी आणि जेट एअरवेज कंपनीतील रिझवान कुरेशी या अधिकाऱ्यानं देखील रेणू शर्मावर असाच आरोप केला आहे.
हा हनी ट्रॅपचा प्रकार- भाजप नेते कृष्णा हेगडे कृष्णा हेगडे एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, 2010 पासून रेणू शर्मा ही महिला मला त्रास देत होती. ती मला फोर्स करत होती की मी तिच्याबरोबर संबंध ठेवावे. मी तिला दुर्लक्षित करत होतो. तरीही ती वेगवेगळ्या नंबरवरुन मला फोन करायची मेसेज करत होती. मी तिच्याबद्दल माहिती काढल्यानंतर हा हनी ट्रॅपचा प्रकार असल्याचे समजले. आता 6 जानेवारीला मला तिनं पुन्हा मेसेज केले. त्यानंतर मला धनंजय मुंडेचं प्रकरण समजलं. इतक्या वर्षानंतर हे प्रकरण बाहेर आणलं. आज मुंडेंचं प्रकरण बाहेर आलं. उद्या मला फसवलं असतं परवा अजून कुणाला फसवलं असतं. म्हणून मी तक्रार द्यायला पोलिसात जात आहे. मी पोलिसांना माहिती दिली आहे. धनंजय मुंडे माझे मित्र नाहीत पण ही महिला कुणालाही टार्गेट करु शकते, असं हेगडे म्हणाले.
... तर माझाही धनंजय मुंडे झाला असता - मनसे नेते मनीष धुरी कृष्णा हेगडे यांच्यानंतर मनसे नेते मनीष धुरी यांनीही ही महिला फोन व मेसेजद्वारे रिलेशनशिपसाठी गळ घालत होती, असं म्हटलंय. परंतु त्यांनी यातून कशीबशी सुटका करून घेतली असल्याचे स्वतः मनीष धुरी यांनी सांगितलं असून, याबाबत तेही पोलिसात तक्रार दाखल करणार आहेत. धुरी यांनी म्हटलंय की, 2008-09 च्या काळात माझाही धनंजय मुंडे झाला असता. त्या वेळी रेणू शर्मानं माझ्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला. व्हिडीओ अल्बम करायचा म्हणून तिने मलाही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. महिला होती आणि पक्ष नवीन होता म्हणून मी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं. तिचा उद्देश चांगल्या लोकांना फसवणे हाच उद्योग असल्याचं माझ्या लक्षात आलं. आता हेगडेंनी तक्रार केली आहे तर मी ही याबाबत तक्रार करणार आहे, असं धुरी यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
जेट एअरवेजमधील अधिकाऱ्याचाही आरोप रेणू शर्मा या महिलेने मे 2018 ते जुलै 2019 दरम्यान सोशल मीडियावरून मैत्री झालेल्या जेट एअरवेज कंपनीतील रिझवान कुरेशी नामक अधिकाऱ्याला देखील अशाच प्रकारे छळले असल्याचे स्पष्ट झाले आहे. रिझवान यांच्यासोबत आधी मैत्री मग हॉटेलिंग आणि बरेच काही अनेक दिवस घडले त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर या महिलेने रिझवान यांच्याविरुद्ध विनयभंग करत बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार मुंबई पोलिसात दाखल केली.
संबंधित बातम्या
कोणीही आरोप केले म्हणून राजीनामा घेणार नाही : जयंत पाटील
बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेचा आणि धनंजय मुंडेंचा जबाब मुंबई पोलीस नोंदवणार