एक्स्प्लोर

Kohinoor Apartment Building Collapsed : भिवंडी इमारत दुर्घटनेबाबत तत्काळ गुन्हा दाखल करा; दोषींवर कठोर कारवाई...; मुख्यमंत्र्यांचे महापालिका प्रशासनाला कठोर कारवाईचे आदेश

Kohinoor Apartment Building Collapsed : घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दल, आपत्कालीन व्यवस्थापन पथक आणि स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले आहे.

भिवंडी: भिवंडी शहरातील बालाजी नगर, गंगारामवाडी परिसरातील 'कोहिनूर अपार्टमेंट' ही चार मजली इमारत कोसळून (Kohinoor Apartment Building Collapsed) झालेल्या भीषण दुर्घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देत दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (ट्विटर) वर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. गंगारामवाडी येथील १२ ते १४ वर्षे जुनी असलेली 'कोहिनूर अपार्टमेंट' ही इमारत अचानक कोसळल्याने (Kohinoor Apartment Building Collapsed) मोठी खळबळ उडाली. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ढिगार्‍याखाली अजूनही २ ते ३ जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दल, आपत्कालीन व्यवस्थापन पथक आणि स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले आहे. (Kohinoor Apartment Building Collapsed)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक्सवरती पोस्ट करताना म्हटलं की, "भिवंडीत एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.  या प्रकरणात तत्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे आदेश महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. जखमींवर उपचार केले जात आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. (Kohinoor Apartment Building Collapsed)

Kohinoor Apartment Building Collapsed : पिलरच्या दुरुस्तीदरम्यान घडली दुर्घटना

मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीच्या पिलरच्या (खांब) दुरुस्तीचे काम सुरू असतानाच ही इमारत अचानक कोसळली. विशेष म्हणजे, ही इमारत धोकादायक झाली असल्याचे ओळखून भिवंडी-निझामपूर शहर महानगरपालिकेने यापूर्वीच तिला धोकादायक घोषित करून नोटीस बजावली होती. असे असूनही ही दुर्घटना घडल्याने प्रशासनाच्या कारभारावर आणि निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिल्यामुळे आता प्रशासनाकडून नेमकी काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काल (30 जुलै) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. दरम्यान घटनेची माहिती मिळतात पालिका आपत्कालीन कक्ष अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी धावून आले. परंतु इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी अरुंद रस्ता असल्या कारणाने बचाव सुरू करण्यात अडथळे येत होते. त्यानंतर रात्री एक वाजता घटनास्थळी एनडीआरएफचे पथक व  टीडीआरएफ दाखल झाले. इमारतीच्या सुरुवातीला असलेली एक जुनी चाळ जेसीबीच्या सहाय्याने तोडून काढल्यानंतर दुर्घटग्रस्त इमारतीपर्यंत यंत्रणा पोहोचली. त्यानंतर बचाव कार्य करण्यासाठी सुरुवात केली आहे. (Kohinoor Apartment Building Collapsed in Bhiwandi)

Kohinoor Apartment Building Collapsed : इमारतीमधील कुटुंब काय म्हणाले?

या इमारतीच्या तळमजल्यावर वरच्या मजल्यावर अनेक जण अडकले होते. अरविंद गुप्ता हे कुटुंब देखील इमारत कोसळत असताना ढिगारा खाली पडत असताना अरविंद गुप्ता व पत्नी बाहेर पडले पण मुलगी कोमल या ढिगाऱ्या खाली अडकली होती. तिने आपली स्वतःची कशीबशी सुटका करून घेत आपला जीव वाचवला. इमारतीच्या दुरुस्तीचे काम  सुरू असताना दुर्घटना घडल्याचे तिने सांगितले. या इमारतीच्या दुर्घटनाग्रस्त भागातील रहिवाशींना परिसरातील स्थानिक तरुणांनी तातडीचे मदत करत अनेक कुटुंबातील सदस्यांना बाहेर काढले. तर ढिगाराखाली अडकलेल्या दोघांना देखील बाहेर काढण्यात त्यांना यश आलं. मात्र अजूनही ढिगाराखाली पाच ते सहाजण असल्याचे माहिती समोर येत आहे . इमारतीमध्ये पिलरचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. 

Kohinoor Apartment Building Collapsed : सुनेत्रा पवारांकडून श्रद्धांजली

भिवंडीतील नारपोली परिसरातील कोहीनूर इमारतीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. शोकाकुल कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या दुर्घटनेत जखमींवर तातडीने उपचार सुरू असून, घटनास्थळी NDRF, अग्निशमन दल, पोलीस प्रशासन तसेच स्थानिक यंत्रणांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. दुर्घटनेतील प्रत्येक बाधित कुटुंबाला आवश्यक ती सर्व मदत आणि सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे, असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या. 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget