एक्स्प्लोर
सकारात्मक बातमी! राज्यात कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर वाढला : राजेश टोपे
राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचा दरही वाढत असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. आतापर्यंत 30 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचे त्यांनी सांगितले.

संग्रहित छायाचित्र
मुंबई : राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचा दरही वाढला असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयांवर ताण येत आहे. या पार्श्वभूमीवर धारावीमध्ये 200 खाटा असलेल्या डीसीएससी हॉस्पिटलचे लोकार्पण आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यत आलं. त्यावेळी ते बोलत होते. धारावीचा डबलिंग रेट हा 30 दिवसांचा आहे. जो देशाच्या रेटपेक्षा अधिक आहे. या नवीन रुग्णालयामुळे धारावीतील रुग्णांना या ठिकाणीच उपचार मिळणार आहे. हळूहळू मुंबईमधील खाटांचा प्रश्न देखील सोडवणार असल्याचे टोपे म्हणाले. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर वाढला आहे. राज्यात आतापर्यंत 30 हजार कोरोना बाधित रुग्ण यशस्वी उपचारानंतर घरी परतले असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. राज्याचा मृत्यू दर 3 टक्के आहे. देशात सर्वाधिक कोरोना चाचणी आपल्या राज्यात करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचं बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. मार्च, एप्रिल, मे महिन्यांची तुलना केली तर, मार्च महिन्यात 302 पैकी 39 असे 12.91 टक्के रुग्ण बरे झाले होते. एप्रिल महिन्यात 10,498 पैकी 1773 असे 16.88 टक्के रुग्ण बरे झाले. मे महिन्यात 67,655 पैकी 29,329 असे एकूण 43.35 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. तर, राज्यातील मृत्यूदर 3.37 टक्के आहे. Coronavirus Update | राज्यात 2361 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 779 रुग्ण कोरोनामुक्त खासगी रुग्णालयाने ठरलेले दर आकारावे काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने खासगी रुग्णालयासाठी दर निर्धारित केले आहेत. त्याप्रमाणेच दर खासगी रुग्णालयांनी आकारावे, अशा सूचना राजेश टोपे यांनी केल्या आहेत. या नियमांचे उल्लघन करणाऱ्या रुग्णालयाविरोधात कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी आमचं एक पथक खासगी रुग्णालयांना भेट देणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. कंटेनमेंट झानमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहून सर्व बंद असणार आहे. राज्यात 2361 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद राज्यात आज कोरोनाच्या 2361 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 70013 वर गेली आहे. यापैकी सध्या राज्यात 37 हजार 234 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान, आज राज्यात 76 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 2362 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 779 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत 30108 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. Corona Ground Report कोरोनाचा ग्रामीण भागातील ग्राऊंड रिपोर्ट! पाहा तुमच्या जिल्ह्यातील कोरोना अपडेट
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
महाराष्ट्र
राजकारण























