एक्स्प्लोर

भ्रष्टाचारी अधिकाऱ्याची बदली रद्द करण्यासाठी भाजप आमदाराकडून मुख्यमंत्र्यांना शिफारस, डॉ. भारती लव्हेकर यांचं पत्र व्हायरल

Dr. Bharti Lavekar Letter : भ्रष्टाचारी अधिकाऱ्याची बदली रद्द करण्यासाठी भाजप आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी मुख्यमंत्र्यांना शिफारस केल्याचं समोर आलं असून त्यांचं पत्र आता व्हायरल होत आहे.

वसई : भ्रष्टाचारी अधिकाऱ्याची बदली रद्द (Corrupt Officer) करण्यासाठी भाजप आमदार डॉ. भारती लव्हेकर (Dr. Bharti Lavekar) यांनी मुख्यमंत्र्यांना शिफारस केल्याचं समोर आलं असून त्यांचं पत्र आता व्हायरल होत आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अधिकाऱ्याची बदली रद्द करण्यासाठी आमदाराचने मु्ख्यमंत्र्यांना पत्र लिहून शिफारस केल्याची बाब समोर आली आहे. आमदार डॉ.  भारती लव्हेकर यांनी सोमेश शिंदे यांची बदली रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेलं पत्र व्हायरल झालं आहे. पालिकेच्या अंधेरी के, पश्चिम कार्यालयातील निलंबित दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांची बदली रद्द करण्यासाठी भारती लव्हेकर यांनी शिफारस पत्र दिल्याचं समोर आलं आहे.

भ्रष्टाचारी अधिकाऱ्याची बदली रद्द करण्यासाठी भाजप शिफारस

वर्सोवा विधानसभेच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी मुख्यमंत्र्यांना सोमेश शिंदे यांचे बदली रद्द करण्यासाठी पत्र लिहिले होते. गेल्या वर्षी  17 ऑक्टोबर 2023 रोजी सोमेश शिंदे यांची नियमानुसार बदली करण्यात आली होती. यानंतर आमदार लव्हेकर यांनी सोमेश शिंदे यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे बदली रोखण्यासाठी शिफारस केली होती. यानंतर सोमेश शिंदे यांना पुन्हा अंधेरी पालिकेच्या के/पश्चिम कार्यालयात दुय्यम अभियंता म्हणून मुदतवाढ मिळाली होती. 

भ्रष्टाचारी अधिकाऱ्यासाठी आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

सोमेश शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप देखील झाले आहेत. सोमेश शिंदे यांच्या काळात वर्सोवा समुद्रकिनारी शेकडो अनधिकृत इमारतींचे बांधकाम झाल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी निष्कासन कारवाई न करणाऱ्या दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यांना महानगरपालिका आयुक्तांच्या निर्देशांचे अवमान केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.

डॉ. भारती लव्हेकर यांचं पत्र व्हायरल

3 जून रोजी वर्सोवा समुद्रकिनारी भागात निष्कासन कारवाई सुरू असताना सोमेश शिंदे यांनी निष्क्रियता दाखवली होती.  निष्कासन कारवाई सुरू असताना ते गाडीत बसून होते, याशिवाय कारवाई पूर्ण होण्याआधीच ते तिथून निधून गेले. कारवाई पूर्ण होईपर्यंत  सह आयुक्त विश्वास शंकरवार आणि के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहान हे कारवाई ठिकाणी थांबून असताना दुय्यम अभियंता सोमेश शिंदे मात्र निघून गेले. 5 जूनच्या पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी बोलावलेल्या बैठकीत देखील दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांनी दांडी मारली होती.


भ्रष्टाचारी अधिकाऱ्याची बदली रद्द करण्यासाठी भाजप आमदाराकडून मुख्यमंत्र्यांना शिफारस, डॉ. भारती लव्हेकर यांचं पत्र व्हायरल

या नंतर दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांना निलंबित करून सोबत पदनिर्देशित अधिकारी स्वप्नील कोळेकर यांची देखील बदली करण्यात आली आहे. वेसावेतील अनधिकृत बांधकामे निष्कासन कारवाईसाठी नवीन विशेष पथकाची नियुक्ती पालिका आयुक्तांनी केली आहे. कामकाजातील निष्काळजी, बेजबाबदारपणा मुळीच खपवून घेतला जाणार नाही, असं म्हणेत महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा अप्रत्यक्षपणे इशारा देखील दिला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

वर्सोवामध्ये पालिका अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांचं पेव, दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Live Blog Updates: एकनाथ शिंदे संसदेत, रिजिजू म्हणाले, श्रीकांत मेरा छोटा भाई, नेमकं काय घडलं?
Live Blog Updates: एकनाथ शिंदे संसदेत, रिजिजू म्हणाले, श्रीकांत मेरा छोटा भाई, नेमकं काय घडलं?
मुंबईत 1.5 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी अटकेत; एसीबीने रंगेहात पडकले, API ला बेड्या
मुंबईत 1.5 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी अटकेत; एसीबीने रंगेहात पडकले, API ला बेड्या
Eknath Shinde On Uddhav Thackeray मोठी बातमी: उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेसाठी फोन केला तर मदत करणार का? एकनाथ शिंदेंचं बेधडक उत्तर!
मोठी बातमी: उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेसाठी फोन केला तर मदत करणार का? एकनाथ शिंदेंचं बेधडक उत्तर!
मोठी बातमी! एसटी महामंडळात 17,742 पदांची कंत्राटी भरती, परिवहन मंत्र्यांनी विधानसभेत दिली माहिती
मोठी बातमी! एसटी महामंडळात 17,742 पदांची कंत्राटी भरती, परिवहन मंत्र्यांनी विधानसभेत दिली माहिती

व्हिडीओ

Eknath Shinde Meet Amit Shah : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात अमित शहांची भेट घेणार
Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
मुंबईत 1.5 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी अटकेत; एसीबीने रंगेहात पडकले, API ला बेड्या
मुंबईत 1.5 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी अटकेत; एसीबीने रंगेहात पडकले, API ला बेड्या
Gold Silver Price Today: युद्धाचा परिणाम; आज सोने-चांदीच्या किमतीत वाढ की घट? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
युद्धाचा परिणाम; आज सोने-चांदीच्या किमतीत वाढ की घट? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
LPG गॅस तुटवड्याची झळ थेट बॉलिवूडपर्यंत; खिलाडी कुमार अन् ट्विंकलची धडधड वाढली, शोधला 'हा' पर्यायी मार्ग, अक्षय म्हणाला...
LPG गॅस तुटवड्याची झळ पोहोचली बॉलिवूडपर्यंत! अक्षय कुमार अन् ट्विंकलने शोधला 'हा' पर्यायी मार्ग, अक्षय थेटच म्हणाला...
मोठी बातमी! एसटी महामंडळात 17,742 पदांची कंत्राटी भरती, परिवहन मंत्र्यांनी विधानसभेत दिली माहिती
मोठी बातमी! एसटी महामंडळात 17,742 पदांची कंत्राटी भरती, परिवहन मंत्र्यांनी विधानसभेत दिली माहिती
Weather Update: राज्यावर अवकाळीचे सावट, गुढीपाडव्याला पावसाची हजेरी, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यावर अवकाळीचे सावट, गुढीपाडव्याला पावसाची हजेरी, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट
Pune Crime News: शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
Mira Bhayander Hospital News: आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील हादरवणारी घटना
Embed widget