एक्स्प्लोर

राजगृहाची तोडफोड करणारा सापडला, 15 दिवसानंतर मुख्य आरोपीला अटक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर 7 जुलै रोजी नासधूस केली होती. या प्रकरणी पोलिसांनी 15 दिवसानंतर तोडफोड करणाऱ्याला अटक केली आहे.

मुंबई :  भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर 7 जुलै रोजी दोघांनी नासधूस केली होती. राजगृहाच्या खिडकीच्या काचाही फोडल्या होत्या तसंच घरातील कुंड्यांचीही नासधूस केली होती. या प्रकरणी पोलिसांनी 15 दिवसानंतर तोडफोड करणाऱ्याला अटक केली आहे. विशाल अशोक मोरे उर्फ विठ्ठल काल्या याला माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे. कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरून त्याला बुधवारी अटक करण्यात आली. राजगृहाबाहेरील परिसरात मोफत जेवण मिळत असल्याने मोरे तिथल्या समोरच्या पदपथावर राहायचा. मात्र घटनेच्या आदल्या दिवशी त्याला हटकले, त्या रागातून त्याने हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. सात जुलैला सायंकाळी घडलेल्या या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी सोबत असणाऱ्या उमेश जाधव याला यापूर्वी पोलिसांनी अटक केली आहे. जाधव परेलचा रहिवाशी असून बिगारी काम करतो. जाधवच्या चौकशीतून तोडफोड करणाऱ्याचे नाव काल्या असल्याचे समोर आले. लाॅकडाऊन दरम्यान जेवण वाटप होत असताना त्याची काल्यासोबत भेट झाली होती. दोघेही पदपथावरच राहायचे. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस काल्यापर्यंत पोहोचले. डॉ. आंबेडकरांच्या राजगृहाच्या बागेत नासधूस, प्रकाश आंबेडकरांकडून शांततेचं आवाहन शांतता राखण्याचं प्रकाश आंबेडकरांचं आवाहन या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी सर्वांना शांतता राखण्याचं आवाहन केलं होतं. आंबेडकर यांनी यासंदर्भात ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट केला होता. सगळ्यांनी शांतता ठेवली पाहिजे. ही गोष्ट खरी आहे की राजगृहावर दोघेजण आले, त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि इतर गोष्टी तोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घातलं. पोलिसांनी त्यांचं काम चोख केलं. जनतेने शांतता राखावी आणि राजगृहाच्या आजूबाजूला जमू नये, अशी विनंती मी करतो, असं त्यांनी म्हटलं होतं.

'राजगृह'बाहेर आता 24 तास पोलीस संरक्षण, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माहिती

महाराष्ट्रासह देशभरात  घटनेचा निषेध दरम्यान महाराष्ट्रासह देशभरात या घटनेचा निषेध विविध संघटनांनी वेगवेगळ्या माध्यमातून केला. राज्यातील अनेक ठिकाणी काळ्या रिबन बांधून नागरिकांनी निषेध केला होता तर काही ठिकाणी आरोपीला शोधून त्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी निवेदनं देण्यात आली होती. तर घटनेनंतर अनेक राजकीय नेत्यांनी राग व्यक्त करत आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शासन करू असं आश्वासन दिलं होतं. तर 'राजगृह'बाहेर आता 24 तास पोलीस संरक्षण देणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं होतं. Rajgruha history | राजगृह म्हणजे बाबासाहेबांचं ज्ञानगृह; इतिहासावर एक नजर

मागील 23 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Mumbai Local Train Marathi News: लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Mumbai Local Train Marathi News: लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Embed widget