एक्स्प्लोर

राज ठाकरेंकडून कल्याण-डोंबिवलीत पक्ष संघटनेत मोठे बदल

कल्याण-डोंबिवलीतील फेरीवाल्यांवर कारवाई का नाही?, असा सवाल राज ठाकरेंनी आयुक्त पी. वेलारासू यांना विचारला.

कल्याण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज कल्याण आणि डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत. डोंबिवलीतील गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर राज ठाकरे महापालिकेत दाखल झाले आणि महापालिका आयुक्त पी. वेलारासू यांच्याशी विकासकामांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले. राज ठाकरेंची केडीएमसी आयुक्तांशी चर्चा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि केडीएमसीचे आयुक्त पी. वेलारासू यांच्यात चर्चा झाली. फेरीवाले, शहरातील स्वच्छता यांसह विविध मुद्द्यांवर राज ठाकरेंनी आयुक्तांशी चर्चा केली. राज ठाकरेंकडून कल्याण-डोंबिवलीत पक्ष संघटनेत मोठे बदल कल्याण-डोंबिवलीतील फेरीवाल्यांवर कारवाई का नाही?, असा सवाल राज ठाकरेंनी आयुक्त पी. वेलारासू यांना विचारला. त्याचसोबत, रेल्वेची हद्द आणि पालिकेची हद्द एकदाच निश्चित करण्याचीही मागणी राज यांनी केली. कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियमित बदली करण्याबाबत राज ठाकरेंनी आयुक्तांना सुचवलं. शिवाय, शहर स्वच्छ दिसायला हवं, असे सांगत राज ठाकरेंनी आयुक्तांकडे आपल्या मागण्या मांडल्या. राज ठाकरेंकडून कल्याण-डोंबिवलीत पक्ष संघटनेत मोठे बदल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाला उभारी देण्यासाठी कल्याण-डोंबिवलीत पक्ष संघटनेत मोठे बदल केले आहेत. डोंबिवली शहरात पक्षाअंतर्गत फेररचना केली. अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांना घरी बसवून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. केडीएमसीत मनसेचे गटनेते असलेले प्रकाश भोईर यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद, तर दीपिका पेडणेकर महिला जिल्हाध्यक्षपद देण्यात आले आहे. कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली विधानसभा हे यांचं कार्यक्षेत्र असणार आहे. प्रकाश भोईर यांच्या रुपाने सक्षम जिल्हाध्यक्ष मिळाला आहे. त्यामुळे येत्या काळात मनसेला आक्रमक आणि पूर्वीच्या पद्धतीने आंदोलनं करताना पाहायला मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. कल्याण-डोंबिवलीत मनसेच्या संघटनेतील बदल पुढीलप्रमाणे : राज ठाकरेंकडून कल्याण-डोंबिवलीत पक्ष संघटनेत मोठे बदल राज ठाकरेंकडून कल्याण-डोंबिवलीत पक्ष संघटनेत मोठे बदल राज ठाकरेंकडून कल्याण-डोंबिवलीत पक्ष संघटनेत मोठे बदल राज ठाकरेंकडून कल्याण-डोंबिवलीत पक्ष संघटनेत मोठे बदल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
Embed widget