एक्स्प्लोर
राज ठाकरे यांची पहिली फेसबुक पोस्ट
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बांधून केवळ दलित मतं आपल्याकडे खेचण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची बोचरी टीका राज ठाकरेंनी आपल्या पोस्टद्वारे केली आहे.
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पहिल्यावहिल्या फेसबुक पोस्टमधून फटकेबाजीला सुरुवात केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बांधून केवळ दलित मतं आपल्याकडे खेचण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची बोचरी टीका राज ठाकरेंनी आपल्या पोस्टद्वारे केली आहे.
केवळ आगामी निवडणुका समोर ठेऊन मुंबईतील इंदू मिलची जागा आंबेडकरांच्या स्मारकासाठी देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं खरं स्मारक हे त्यांचे गडकिल्ले आहेत. त्यांचं संवर्धन करणं आणि त्यातून आत्ताच्या आणि येणाऱ्या पिढयांना स्फूर्ती मिळणं हा त्या स्मारकामागचा उद्देश हवा, असं राज यांनी म्हटलं आहे.
महापुरूषांच्या व्यक्तीमत्वाप्रमाणेच त्या स्मारकाचं स्थापत्यशास्त्र असावं असं मतंही या पोस्टमध्ये त्यांनी दिलं आहे.
राज ठाकरे यांची फेसबुक पोस्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement