(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raj Thackeray Speech Live Updates: माहीम दर्गा अनधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेच्या हद्दीत येत नसल्याचं मुंबई महापालिकेकडून स्पष्टीकरण
Raj Thackeray LIVE: मशिदीवरील भोंगे, मुंबई महापालिका निवडणूक, शिवसेना, भाजप यासह राज्यातील राजकीय परिस्थितीवर राज ठाकरे भाष्य करण्याची शक्यता आहे. सभेसाठी राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते मुंबईत जमत आहेत
LIVE
Background
Raj Thackeray Speech LIVE : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांचा गुढीपाडवा मेळावा आज शिवाजी पार्कवर होत आहे. मनसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात सगळं बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला होता. यामुळे पाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मशिदीवरील भोंगे, मुंबई महापालिका निवडणूक, शिवसेना, भाजप यासह राज्यातील राजकीय परिस्थितीवर राज ठाकरे भाष्य करण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्या सभेसाठी राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते मुंबईत जमत आहेत. विशेषत: मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नाशिक-पालघरमधून कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात येत आहेत.
Raj Thackeray Speech Live Updates: कल्याण डोंबिवलीतून सहा ते सात हजार कार्यकर्ते
मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्कमध्ये पार पडणार आहे असून या मेळाव्याची सध्या जय्यत तयारी सुरु आहे. सभेचे नियोजन दणक्यात होणार असून अख्ख्या देशात कुठल्याही पक्षांनी एवढी मोठी एलईडी लावली नसेल एवढी एलईडी सभेच्या ठिकाणी लावण्यात आली आहे. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर येथून दोनशे बसेस जाणार आहे साधारणतः सहा ते सात हजार मनसे कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या सभेला शिवाजी पार्क येथे उपस्थित राहणार आहेत.
पालघरच्या ग्रामीण भागातून ही मोठ्या प्रमाणावर मनसैनिक मुंबईकडे रवाना होत असून हे मनसैनिक पालघर मधील मनोहर येथे सध्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत जमण्यास सुरुवात झाली आहे. पालघरच्या ग्रामीण भागातील जवळपास चार ते पाच हजार मनसैनिक मुंबईत रवाना होणार असल्याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. यावेळी मुंबईकडे जाणाऱ्या मनसैनिकांची गैरसोय होऊ नये म्हणून या मनसैनिकांसाठी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोर येथे मनसे पदाधिकाऱ्यांकडून खानपानाची व्यवस्था करण्यात आली आहे . तसंच पालघर मधील ग्रामीण भागातील 100 बस आणि 800 खाजगी वाहनांनी हे मनसैनिक मुंबईकडे निघाले आहेत.
Mahim Dargah : माहीम दर्गा अनधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेच्या हद्दीत येत नसल्याचं मुंबई महापालिकेकडून स्पष्टीकरण
माहीम दर्गा अनधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेच्या हद्दीत येत नसल्याचं मुंबई महापालिकेकडून स्पष्टीकरण
समुद्रातील आतील भागात बांधकाम असल्याने सदर अनधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेच्या हद्दीत येत नसल्याचं मुंबई महापालिकेकडून स्पष्टीकरण.
मुंबई जिल्हाधिकारी यांच्या हद्दीत या संदर्भात कारवाईचे अधिकार आहेत.
मुंबई महापालिका आयुक्त हे मुंबई पोलीस आयुक्त त्यासोबतच मुंबई जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून कारवाई संदर्भात निर्णय घेतील.
मुंबई महापालिका कायद्यानुसार समुद्राच्या किनाऱ्याच्या आतील भागात मुंबई महापालिकेची हद्द संपते, त्यामुळे या हद्दीमध्ये मुंबई महापालिका कारवाई करू शकत नाही.
तरीसुद्धा मुंबई महापालिका आयुक्त हे मुंबई पोलीस आयुक्त त्यासोबतच मुंबई जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून कारवाई संदर्भात निर्णय घेतील.
मुंबई महापालिका अधिकारीसुद्धा या संदर्भात पाहणी करणार आहेत.
Raj Thackeray : माहिमच्या समुद्रातील दर्गा जर तोडला नाही तर त्याच्या शेजारी गणपतीचं मंदिर उभं करणार; राज ठाकरे
Raj Thackeray Speech : माहिमच्या समुद्रामध्ये दर्गा तयार करण्यात आला आहे. दोन वर्षात हा दर्गा उभारण्यात आला आहे. येत्या महिन्याभरात जर कारवाई झाली नाही, माहिमच्या समुद्रातील दर्गा तोडला नाही तर त्याच्या बाजूला सर्वात मोठं गणपतीचं मंदिर उभं करणार असं राज ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिसांनी यावर कारवाई केली नाही तर याद राखा असं आव्हानदेखील राज ठाकरे यांनी दिलं.
Raj Thackeray : राज्य सरकारने मशिदीवरील भोंगे काढावे किंवा आमच्याकडे दुर्लक्ष करावं, आम्ही काढतो; राज ठाकरे
Raj Thackeray Speech : मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की त्यांनी मशिदीवरील भोंगे काढावेत. एक तर तुम्ही करा किंवा आमच्याकडे दुर्लक्ष करा, आम्ही ते काढतो असं राज ठाकरे म्हणाले.
Raj Thackeray : पाकिस्तानात जाऊन त्यांना खडे बोल सुनावणारे जावेद अख्तर यांच्यासारखे मुस्लिम मला हवेत; राज ठाकरे
Raj Thackeray Speech Live Updates: मला जावेद अख्तर यांच्यासारखे मुस्लिम हवेत, त्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांनाच खडे बोल सुनावले, त्यांच्यासारखे महाराष्ट्रातील मुस्लिम मला हवेत असं राज ठाकरे म्हणाले.
Raj Thackeray : हे अलिबाबा आणि 40 जण, महाराष्ट्रात लूट करुन सुरतेला गेलेले हे पहिलेच; राज ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांना टोला
Raj Thackeray Speech Live Updates: शिवसेना फुटल्यानंतर अलिबाबा आणि 40 जण बाहेर गेले. महाराज सुरतेवरून लूट करुन महाराष्ट्रात आले... पण महाराष्ट्रातून लूट करून सुरतेला गेलेले हे पहिलेच. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, राज्यासाठी काम कर, उद्धव ठाकरे यांच्या मागे भाषणं देत फिरू नका असा टोला राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.