एक्स्प्लोर
Advertisement
दसरा मेळाव्यानंतर शिवसैनिकांचं राज ठाकरेंशी हस्तांदोलन
दसरा मेळावा संपल्यानंतर परतणाऱ्या शिवसैनिकांनी राज ठाकरेंशी हस्तांदोलन केलं.
मुंबई : शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज्यभरातून शिवसैनिकांनी हजेरी लावली. मात्र या मेळाव्यानंतर एक काहीशी विस्मयकारक घटना घडली. मेळावा संपल्यानंतर परतणाऱ्या शिवसैनिकांनी राज ठाकरेंशी हस्तांदोलन केलं.
नेमकं काय घडलं?
दसऱ्यानिमित्त शिवतीर्थावर शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यानंतर शिवसैनिक आपापल्या घरी परतू लागले. त्यावेळी काही शिवसैनिक शिवतीर्थाच्या बाजूलाच राहणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घराबाहेरुन जात होते.
त्यावेळी राज ठाकरे तळमजल्यावर काचेच्या खोलीत काहीतरी लेखन करत बसले होते. किंवा व्यंगचित्र वगैरे रेखाटत असावेत. त्यावेळी बाहेरुन जाणाऱ्या शिवसैनिकांना राज ठाकरे दिसले आणि ते जागच्या जागी थांबले.
या शिवसैनिकांनी राज ठाकरेंना कंपाऊंडबाहेरुनच हाका मारण्यास सुरुवात केली. ‘राजसाहेब बाहेर या’ अशा घोषणा सुरु झाल्या. तिथे सुरक्षेसाठी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना गप्प करण्याचा, अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसैनिकांना राज ठाकरेंना उद्देशून आपल्या घोषणा सुरुच ठेवल्या.
राज ठाकरेंनी सुरुवातीला हाका मारणाऱ्या शिवसैनिकांना आतूनच अभिवादन केलं. मात्र शिवसैनिक घोषणा देण्याचे काही थांबत नव्हते. मग अखेर राज ठाकरे स्वत: बाहेर आले आणि त्यांनी तिथे जमलेल्या शिवसैनिकांना हस्तांदोलन केले.
राज ठाकरेंनी आपली हाक ऐकून बाहेर येणे आणि हस्तांदोलन करणे, या सर्व गोष्टींमुळे शिवसैनिक अत्यंत भारावून गेले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सांगली
निवडणूक
Advertisement