एक्स्प्लोर
Advertisement
वल्लभभाईंना तरी कसे पटेल?, राज ठाकरेंचे मोदी सरकारवर फटकारे
स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी गुजरात आणि केंद्र सरकारकडून आतापर्यंत एकूण 2131.45 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तर यावर आणखी सुमारे 300 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
मुंबई : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'वरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. राज ठाकरेंनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर काल एक व्यंगचित्र प्रसिद्ध केलं आहे. पुतळ्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. यावरुन 'वल्लभभाईंना तरी कसे पटेल?' असं म्हणत राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
जिवंत माणसांना जगवा!
स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी गुजरात आणि केंद्र सरकारकडून आतापर्यंत एकूण 2131.45 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तर यावर आणखी सुमारे 300 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. त्यामुळे या पुतळ्याचा खर्च जवळपास 2400 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यावरुनच राज ठाकरेंनी मोदी सरकारवर हल्लाबोल करत वल्लभभाईंना तरी कसं पटेल? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसंच "अरे, तुमच्या स्वार्थी राजकारणासाठी अवाढव्य खर्च करुन आमचे पुतळे उभे करण्यापेक्षा, आहेत ती जिवंत माणसं जगवा ना!," असा सल्ला सरदार पटेल सत्ताधाऱ्यांना देत असल्याचं चित्र राज ठाकरेंनी साकारलं आहे.
राज ठाकरेंचं व्यंगचित्र
राम सुतार यांनी मूर्ती साकारली
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'च्या बांधकाम लार्सन अँड टूब्रो कंपनीने केलं आहे. यानंतर एल अँड टीने पुतळा साकारण्याची जबाबदारी वयाची नव्वदी पार केलेले मराठमोळे चिरतरुण मूर्तीकार राम सुतार यांच्या खांद्यावर सोपवली. ब्राँझच्या आठ मिमी जाडीच्या 7000 हून अधिक शीट्स जोडून या पुतळ्याला आकार देण्यात आला आहे. या पुतळ्याच्या पायथ्याला एक भव्य संग्रहालय आणि प्रदर्शन केंद्र बनवलं जाणार आहे. जवळच अडीचशे माणसं एकाच वेळी बसू शकतील असं फूड कोर्ट उभं राहत आहे. याशिवाय आजूबाजूच्या भागातही आणखी काही संकल्पनांवर काम करुन एक संपूर्ण पर्यटन केंद्र उभारण्याचा मानस आहे. गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात केवडिया भागात हा जगातला सर्वात मोठा पुतळा उभा राहिला आहे.
मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टमागील राजकारण
मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टची जितकी भव्यता आहे, तितकीच त्यामागील राजकारणाची पार्श्वभूमीही. या पुतळ्याची उंची आणि गुजरातमधील विधानसभा मतदारसंघांची संख्या समान आहे. हार्दिक पटेलच्या आंदोलनामुळे पटेल समाज दुरावला आहे. सरदार पटेलांचा हा भव्य पुतळा पटेल समाजाला चुचकारण्याचं भाजपचं शस्त्र आहे. त्यामुळे विरोधकांमध्य़े अस्वस्थता आहे.
स्टॅच्यू ऑफ युनिटीचं उद्या अनावरण
भारताचा अभिमान ठरणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' पुतळ्याचं उद्या अनावरण होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते जगातल्या या सर्वात उंच पुतळ्याचं उद्या उद्घाटन होईल. महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी मराठमोळे कला दिग्दर्शक नितीन चंद्रकात देसाई यांच्यावर सोपवण्यात आली आहे. उद्या अनावरण झाल्यानंतर परवापासून म्हणजे 1 नोव्हेंबरपासून स्टॅच्यू ऑफ युनिटी सर्वसामान्य लोकांना पाहण्यासाठी खुलं होईल. संपूर्ण 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' पाहायची असेल तर त्याचा तिकीट दर 500 रुपये आहे. इथे गेल्यानंतर पर्यटकांना स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून 3 किमी लांब अंतरावर वाहनं पार्क करावी लागतील. तिथून एका बसद्वारे स्मारकापर्यंत पोहोचवण्याची सोय केली जाणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement