(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raj Kundra Pornography Case : राज कुंद्राच्या पॉर्न साम्राज्याबाबत शिल्पाला माहिती नव्हती; क्राईम ब्रांच करणार तिच्या फोनचं क्लोनिंग
Pornography Case : पॉर्नोग्राफिक फिल्म बनवून आणि काही अॅपवर ती पब्लिश केल्या ठपका ठेवत व्यावसायिक राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे.
Raj Kundra Pornography Case : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांची क्राईम ब्रांच राज कुंद्राची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टीला पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवलं जाऊ शकतं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई पोलिसांची क्राईम ब्रांच अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या फोनची क्लोनिंग घेण्याच्या तयारीत आहे. या प्रकरणी शिल्पाची चौकशी केली जात आहे. राज कुंद्राशी निगडीत पॉर्न रॅकेटची चौकशी करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या एका टीमनं शुक्रवारी या प्रकरणी शिल्पा शेट्टीचा जबाब नोंदवला होता.
अॅपवरील कंटेंटबाबत शिल्पाला माहिती नव्हती
एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या वक्तव्यात मुंबई पोलिसांच्या सुत्रांनी सांगितलं की, "शिल्पानं दावा केला आहे की, 'हॉटशॉट्स' साठी तयार करण्यात आलेल्या व्हिडीओच्या कंटेंटबाबत तिला काहीच माहिती नव्हती. 'हॉटशॉट्स' हे एक मोबाईल अॅप आहे. याच अॅपवर अश्लील व्हिडीओ पब्लिश केल्याचा ठपका राज कुंद्रावर ठेवण्यात आला आहे.
कुंद्राने 2 टीबी डेटा हटवला?
गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी कुंद्राच्या अंधेरी कार्यालयात छापा टाकला आणि बरीच माहिती जप्त केली, या व्यतिरिक्त गुन्हे शाखेलाही त्यातून बराच डेटा हटवल्याचा संशय आहे.
स्टोरेज एरिया नेटवर्क मधून बरेच डेटा गहाळ झाले आहेत असा संशय पोलिसांना आहे. कुंद्राच्या कंपनीचे आयटी हेड रायन थॉर्पे यांनी पोलिसांना सांगितले की सर्व व्हिडीओ लंडनमधील केनरिन कंपनीला पाठविला गेले. जे कुंद्राच्या कार्यालयातूनच पाठविले गेले, जेणेकरून ते हॉटशॉटवर अपलोड केले जाऊ शकेल.
कुंद्रा पोलिसांच्या तपासात सहकार्य करीत नसल्याचेही सूत्रांनी सांगितले आणि ते म्हणाले की सर्व काही लंडनची कंपनी चालवणारे त्यांचे मेव्हणे प्रदीप बक्षी यांनी केले होते. पोलिसांकडून मिळालेल्या व्हॉट्सअॅप चॅटसंदर्भात कुंद्राने सांगितले की, तो फक्त व्हॉट्सअॅपवर बोलत असे, परंतु काहीही केले नाही.
तीन व्हॉट्सअॅप ग्रुप अन् लीगल टीमच्या आधारे सुरु होतं राज कुंद्राच्या पॉर्न फिल्म्सचं साम्राज्य
पॉर्न फिल्म बनवल्या प्रकरणी अटकेत असलेल्या राज कुंद्राच्या चौकशीत मोठे खुलासे होत आहेत. राज कुंद्राकडून ज्या पॉर्न फिल्म बनवल्या जात होत्या त्यांची पायरसी थांबवण्यासाठी राज कुंद्राने लीगल टीम बनवली होती. इतकच नाही तर आपल्या पॉर्न फिल्मचं काम सुरळीत सुरु ठेवण्यासाठी राज कुंद्राने तीन व्हॉट्सअॅप ग्रुपसुद्धा बनवले होते. ज्या ग्रुपमधील प्रत्येक व्यक्तीचं काम निश्चित केलं गेलं होतं. या व्हॉट्सअॅप ग्रुपची नावे HS-ACCOUNT, HS-OPERATION आणि HS-TAKE DOWN अशी होती. या तीन व्हॉट्सअॅप ग्रुपच्या सहाय्याने राज कुंद्रा पॉर्न फिल्म बनवण्या संदर्भातील सर्व कामे हाताळत होता. अशा प्रकारे या तीन व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे राज कुंद्राच काम सुरु होतं.
पॉर्न व्हिडीओ बनवण्यासाठी काय होता राज कुंद्राचा 'Plan B'?
एबीपी न्यूजच्या हाती लागलेल्या व्हॉट्सअॅप चॅटनुसार, "एच अकाउंट्स" नावाच्या ग्रुपमध्ये प्रदीप बक्शीने हॉटशॉट अॅप नियमांची पूर्तता न केल्यामुळे गूगलनं सस्पेंड केलं असल्याची माहिती ग्रुपमध्ये टाकली होती. त्यानंतर राज कुंद्रानं रिप्लाय दिला की, "काहीच हरकत नाही. प्लान बी सुरु झाला आहे. जास्तीत जास्त 2 ते 3 आठवड्यांत नवं अॅप्लिकेशन लाईव्ह होईल."
राज कुंद्राचा प्लान बी म्हणजे, बोलिफेम. हा प्लान राज कुंद्रानं तयार केला होता. पॉर्न इंडस्ट्रीला नव्या दिशेनं पुढे घेऊन जाण्यासाठी राज कुंद्रानं हा प्लान तयार केला होता. यादरम्यान, कामत आणि राज कुंद्रा या दोघांमधील आणखी एक चॅट समोर आलं, ज्यामध्ये राज कुंद्राने कामतला एक न्यूज आर्टिकल पाठवलं, या आर्टिकलमध्ये लिहिलं होतं की, "पॉर्न व्हिडीओ 7 ओटीटीवर प्रसारित केल्यामुळे पोलीस 7 ओटीटी मालकांना समन्स पाठवण्याची शक्यता आहे."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Raj Kundra : तीन व्हॉट्सअॅप ग्रुप अन् लीगल टीमच्या आधारे सुरु होतं राज कुंद्राच्या पॉर्न फिल्म्सचं साम्राज्य
- Pornography Case : राज कुंद्राच्या पॉर्न रॅकेटबाबत माहिती होतं? क्राईम ब्रांचच्या प्रश्नाला शिल्पानं दिलं 'हे' उत्तर
- Raj Kundra Case :अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत राज कुंद्रा यांची हायकोर्टात याचिका
- Raj Kundra : 'डर्टी पिक्चर'चा तुरुंगात 'दी एन्ड'? अशी झाली राज कुंद्राच्या पॉर्न रॅकेटची पोल-खोल