Raj Kundra : तीन व्हॉट्सअॅप ग्रुप अन् लीगल टीमच्या आधारे सुरु होतं राज कुंद्राच्या पॉर्न फिल्म्सचं साम्राज्य
राज कुंद्राच्या पॉर्न रॅकेटचा कारभार तीन व्हॉट्सअॅप ग्रुप अन् लीगल टीमच्या आधारावर सुरु होता, अशी माहिती पोलीस चौकशीतून समोर आली आहे.
मुंबई : पॉर्न फिल्म बनवल्या प्रकरणी अटकेत असलेल्या राज कुंद्राच्या चौकशीत मोठे खुलासे होत आहेत. राज कुंद्राकडून ज्या पॉर्न फिल्म बनवल्या जात होत्या त्यांची पायरसी थांबवण्यासाठी राज कुंद्राने लीगल टीम बनवली होती. इतकच नाही तर आपल्या पॉर्न फिल्मचं काम सुरळीत सुरु ठेवण्यासाठी राज कुंद्राने तीन व्हॉट्सअॅप ग्रुपसुद्धा बनवले होते. ज्या ग्रुपमधील प्रत्येक व्यक्तीचं काम निश्चित केलं गेलं होतं. या व्हॉट्सअॅप ग्रुपची नावे HS-ACCOUNT, HS-OPERATION आणि HS-TAKE DOWN अशी होती. या तीन व्हॉट्सअॅप ग्रुपच्या सहाय्याने राज कुंद्रा पॉर्न फिल्म बनवण्या संदर्भातील सर्व कामे हाताळत होता. अशा प्रकारे या तीन व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे राज कुंद्राच काम सुरु होतं.
काय होत होतं या तिनही व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये?
HS-ACCOUNT
या ग्रुपमध्ये कन्टेन्ट, सबस्क्रायबर, पेमेंट, ट्रांजेक्शन आणि पॉर्न फिल्म बिजनेसमधून झालेल्या प्रॉफिट संदर्भातील गोष्टी असायच्या.
HS-OPERATION
दुसऱ्या ग्रुपचं नाव एचएस ऑपरेशन असं होतं. या ग्रुपमध्ये कशा प्रकारच्या पॉर्नची मागणी आहे? ते कधी आणि कुठे शूट करायचं? त्या पॉर्न फिल्ममध्ये कोण काम करणार? त्यांना किती रक्कम दिली जाणार? आणि फिल्म एडिटिंग या संदर्भात बोलणं व्हायचं. तसेच त्याचं फायनल कन्टेन्ट आणि त्याची प्रिंट किंवा लिंकद्वारे लंडन मधील इंडस्ट्रीज लिमिटेड यांना पाठवायचे.
HS-TAKE DOWN
तिसऱ्या ग्रुपचं नाव एचएस टेक डाऊन असं होतं. जो सगळ्यात महत्वाचा ग्रुप होता या ग्रुपचा मुख्य उद्देश बनवण्यात आलेल्या पॉर्न फिल्म्सवर पाळत ठेवणं आणि कोणी त्यांची पायरसी तर करत नाही ना? यावर लक्ष ठेवणं होतं. HOTSHOTS अॅपवर ज्या पॉर्न फिल्म अपलोड केल्या जायच्या, त्या जर इतर कुठल्या ॲपवर अपलोड झाल्या तर त्यांना कायदेशीर नोटीस पाठवणे, पायरसी करण्यात आलेला कन्टेन्ट ब्लॉक करणे, पायरसी करून जे नुकसान केलं त्याची नुकसान भरपाई करून घेणे आणि त्यांना कायदेशीर भीती दाखवणे, हे या ग्रुपचा मुख्य उद्दिष्ट होतं.
पॉर्न व्हिडीओ बनवण्यासाठी काय होता राज कुंद्राचा 'Plan B'?
एबीपी न्यूजच्या हाती लागलेल्या व्हॉट्सअॅप चॅटनुसार, "एच अकाउंट्स" नावाच्या ग्रुपमध्ये प्रदीप बक्शीने हॉटशॉट अॅप नियमांची पूर्तता न केल्यामुळे गूगलनं सस्पेंड केलं असल्याची माहिती ग्रुपमध्ये टाकली होती. त्यानंतर राज कुंद्रानं रिप्लाय दिला की, "काहीच हरकत नाही. प्लान बी सुरु झाला आहे. जास्तीत जास्त 2 ते 3 आठवड्यांत नवं अॅप्लिकेशन लाईव्ह होईल."
राज कुंद्राचा प्लान बी म्हणजे, बोलिफेम. हा प्लान राज कुंद्रानं तयार केला होता. पॉर्न इंडस्ट्रीला नव्या दिशेनं पुढे घेऊन जाण्यासाठी राज कुंद्रानं हा प्लान तयार केला होता. यादरम्यान, कामत आणि राज कुंद्रा या दोघांमधील आणखी एक चॅट समोर आलं, ज्यामध्ये राज कुंद्राने कामतला एक न्यूज आर्टिकल पाठवलं, या आर्टिकलमध्ये लिहिलं होतं की, "पॉर्न व्हिडीओ 7 ओटीटीवर प्रसारित केल्यामुळे पोलीस 7 ओटीटी मालकांना समन्स पाठवण्याची शक्यता आहे."
लाईव्ह कंटेंट भविष्य
राज कुंद्रा चॅटमध्ये असं बोलताना दिसतो की, येणाऱ्या काळात भविष्य लाईव्ह कंटेंटचा आहे. कारण स्क्रिन रेकॉर्डिंग शक्य नाही. क्राईम ब्रांचच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्रा पॉर्न शूट थांबवून मॉडेल आणि अभिनेत्रींना लाईव्ह स्ट्रिमिंग करण्याची तयारी करत होता. हिच लाईव्ह स्ट्रिम करण्यासाठी बोलिफेमची तयारी केली जात होती.
अशी झाली राज कुंद्राची पोल-खोल?
मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितलं की, फेब्रुवारी 2021 मध्ये अश्लील चित्रपट बनवणे आणि काही अॅप्सवर ते दाखवल्याबद्दल राज कुंद्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज कुंद्रा आणि अन्य काही लोकांविरोधात एका महिलेने मुंबई पोलिसांकडे या संबंधी एक गुन्हा दाखल केला होता. राज कुंद्रा आणि त्याच्या साथीदारांनी वेब सीरिजमध्ये काम करण्यासाठी ऑफर दिली आणि जबरदस्तीने पॉर्न चित्रपट बनवले असा आरोप त्या महिलेने केला आहे. या पॉर्न रॅकेटचा मास्टरमाईंड हा राज कुंद्रा आहे असं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे. राज कुंद्रा आणि त्याच्या पाच साथीदारांना अटक करण्यात आली आहे.
ब्रिटनमध्ये केंद्रीन नावाच्या एका कंपनीचे रजिस्ट्रेशन करण्यात आलं होतं. ही कंपनी ओटीपी प्लॅटफॉर्मवर अश्लील चित्रपट पब्लिश करायची. या कंपनीची निर्मीती राज कुंद्राने केली होती. भारतातील सायबर कायद्यापासून वाचण्यासाठी त्याने ब्रिटनमध्ये या कंपनीचे रजिस्ट्रेशन केलं होतं. राज कुंद्राच्या परिवारातील अनेक सदस्य या कंपनीचे संचालक आहेत. या कंपनीच्या माध्यमातून मुंबई आणि देशातील इतर ठिकाणी शूट करण्यात आलेले पॉर्न मटेरियल अपलोड करण्यात यायचे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :